'इन्स्टा'वरच्या याच फोटोमुळे 'उतरन' फेम टिनाची मोडली भीती

टीम ई सकाळ
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

टिना दत्ता हे नाव हिंदीवरच्या छोट्या पडद्याला नवं नाही. उतरन मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली. टिना सोशल मिडीयावरही बरीच चर्चेत असते. पण गेल्या दोन दिवसांपासून मात्र तिची क्रेझ भलतीच वाढली आहे. कारण टिनाने नुकताच एक फोटो इन्स्टावर टाकला आहे. तो फोटो बिकिनीतला नसला तरी बोल्ड आहे. हा फोटो टाकल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रीया येतील याबद्दल तिला धाकधुक होती, पण मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून टिना सुखावली आहे. 

मुंबई : टिना दत्ता हे नाव हिंदीवरच्या छोट्या पडद्याला नवं नाही. उतरन मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली. टिना सोशल मिडीयावरही बरीच चर्चेत असते. पण गेल्या दोन दिवसांपासून मात्र तिची क्रेझ भलतीच वाढली आहे. कारण टिनाने नुकताच एक फोटो इन्स्टावर टाकला आहे. तो फोटो बिकिनीतला नसला तरी बोल्ड आहे. हा फोटो टाकल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रीया येतील याबद्दल तिला धाकधुक होती, पण मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून टिना सुखावली आहे.

लाल बिकिनी वजा पेहेेराव करून तिने जमिनीवर झोपलेला फोटो अपलोड केला आहे. यात तिचा चेहरा नीट दिसत नसला, तरी तिची फिगर सहज लक्षात येते. 

त्याला चाहत्यांचा प्रतिसादही मोठा आहे. याबाबत बोलताना टिना म्हणते, मी आजवर असे फोटो कधीच टाकले नव्हते, लोक काय म्हणतील, माझी मालिकेतील इमेज बघता ते मला स्वीकारतील का अशी शंका मनात होती. पण मी टाकलेल्या फोटोला मिळालेल्या कमेंटस बघता मला छान वाटलं आहे. लोक मला या रुपातही स्वीकारतील अशी आता खात्री झाली आहे. 

टॅग्स