'ई सकाळ'च्या एफबी लाईव्हमध्ये उलगडला 'अर्धसत्य' नाटकाचा 'तिसरा अंक'

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मराठी माणसाच्या मनात नाटकाबद्दल अपार आपुलकी आहे. चांगली नाटकं बघितली पाहिजेत असं त्याला नेहमी वाटत असतं. मराठी नाटकाला चांगलं व्यासपीठ मिळावं या हेतूने ई सकाळने अंक तिसरा हा उपक्रम सुरू केला. पहिल्या भागात जगभरातल्या नाट्यरसिकांनी अनुभवली ती आॅल द बेस्ट 2 या नाटकातल्या कलाकारांची मैफल. त्यानंतर या उपक्रमात सहभाग घेतला तो अर्धसत्य नाटकातल्या टीमशी. यात डाॅ. अमोल कोल्हे, दिपक करंजीकर, लेखक प्रसाद दाणी, गौरीश आणि सरिता मेहेंदळे यांनी सहभाग घेतला. 

पुणे : मराठी माणसाच्या मनात नाटकाबद्दल अपार आपुलकी आहे. चांगली नाटकं बघितली पाहिजेत असं त्याला नेहमी वाटत असतं. मराठी नाटकाला चांगलं व्यासपीठ मिळावं या हेतूने ई सकाळने अंक तिसरा हा उपक्रम सुरू केला. पहिल्या भागात जगभरातल्या नाट्यरसिकांनी अनुभवली ती आॅल द बेस्ट 2 या नाटकातल्या कलाकारांची मैफल. त्यानंतर या उपक्रमात सहभाग घेतला तो अर्धसत्य नाटकातल्या टीमशी. यात डाॅ. अमोल कोल्हे, दिपक करंजीकर, लेखक प्रसाद दाणी, गौरीश आणि सरिता मेहेंदळे यांनी सहभाग घेतला. 

या नाटकाची टीम बोलती झाली ती दुपारी चार वाजता. अर्धसत्य नाटक, त्याचे प्रमोशनचे फंडे, आपआपल्या भूमिकांविषयी कालाकारांनी आपले अनुभव शेअर केले. प्रसाद दाणी यांनी लिहिलेलं हे नाटक सिस्टिमवर भाष्य करतं. एका दहशतवाद्याचा खात्मा पोलिसात काम करणारा गोडसे हा पीआय करतो. त्याचं स्पष्टीकरण देताना या दहशतवाद्याला मी ठार मारलं याचं 51 टक्के व्यक्तीगत कारण असून 49 टक्के हे कारण कर्तव्य आहे असं सांगतो. याच वाक्याभवती हे नाटक फिरतं. दिपक करंजीकर आणि अमोल यांच्यात या निमित्ताने जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. विशेष बाब अशी की या नाटाकात अमोल यांनी चक्क गणपती डान्स साकारला आहे. ही माहिती पीआय गोडसे यांच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या सरिता यांनी दिली. त्यावेळी एकच हशा पिकला.

अत्यंत खेळीमेळीच्या वातवरणात कलाकारांनी या नाटकाची माहीती दिली. अभिनेत्री रेश्मा रामचंद्र, ज्येष्ठ दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे, अभिनेते विद्याधर जोशी आदी मंडळी आॅनलाईन होती. या सर्वांनी या मैफलीचा अस्वाद घेतला. दिपक यांनी ई सकाळने नाटकासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं. या मैफीलचा आस्वाद हजारो नाट्यप्रेमींनी घेतला.