टिस्काला साकारायचीय अमृता प्रीतम 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जून 2017

सध्या बॉलीवूडमध्ये चरित्रपटांची लाट पाहायला मिळतेय. त्यात आता अभिनेत्री टिस्का चोप्रानं चरित्रपट करायला आवडेल, असं सांगितलंय.

सध्या बॉलीवूडमध्ये चरित्रपटांची लाट पाहायला मिळतेय. त्यात आता अभिनेत्री टिस्का चोप्रानं चरित्रपट करायला आवडेल, असं सांगितलंय.

त्यातही तिने लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांची भूमिका साकारायला आवडेल, असंही सांगितलं. "अमृता ऍण्ड मी' या लघुपटाच्या एका कार्यक्रमात टिस्का म्हणाली की, "अमृता प्रीतम यांचं साहित्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे रुपेरी पडद्यावर त्यांची भूमिका साकारायला नक्कीच आवडेल.' "अमृता ऍण्ड मी' या लघुपटात अमृता प्रीतम यांची भूमिका श्रुती उल्फत यांनी साकारलीय. अमृता प्रीतम यांचं व्यक्तिमत्त्व खूपच आकर्षक आहे. साहिर लुधियानवी आणि अमृता यांच्यातील नातेसंबंधाबद्दल सगळ्यांना माहीत आहे; पण अमृता आणि इमरोज यांच्यातील नातेसंबंधाबद्दल लोक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे इमरोज यांच्या दृष्टिकोनातून त्यांची कथा मला अधिक आवडते, असं टिस्का सांगत होती.