..अन उपेंद्र लिमयेचं शूटिंग झाले तीन वेळा बंद!

टीम ई सकाळ
गुरुवार, 27 जुलै 2017

स्टार प्रवाहच्या नकुशी या मालिकेतील नकुशी-रणजित ही जोडी लोकप्रिय आहे. रणजितचा बिनधास्त अॅटिट्यूड प्रेक्षकांना आवडतो. त्याची बोलण्याची ढबही एकदम खास आहे. म्हणूनच लालबागचा रणजित प्रेक्षकांना आपलासा वाटतो. रणजित ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय आहे, याचा अनुभव देणारी एक घटना नुकतीच पुण्यात घडली. या मालिकेतील रणजित ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता उपेंद्र लिमयेला फॅन्सनी त्याला गराडा घातला. इतकंच नाही, तर तीन वेळा शूटिंग थांबवावं लागलं.

मुंबई : स्टार प्रवाहच्या नकुशी या मालिकेतील नकुशी-रणजित ही जोडी लोकप्रिय आहे. रणजितचा बिनधास्त अॅटिट्यूड प्रेक्षकांना आवडतो. त्याची बोलण्याची ढबही एकदम खास आहे. म्हणूनच लालबागचा रणजित प्रेक्षकांना आपलासा वाटतो. रणजित ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय आहे, याचा अनुभव देणारी एक घटना नुकतीच पुण्यात घडली. या मालिकेतील रणजित ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता उपेंद्र लिमयेला फॅन्सनी त्याला गराडा घातला. इतकंच नाही, तर तीन वेळा शूटिंग थांबवावं लागलं.
 
उपेंद्र लिमये पुण्यातील कल्याणीनगर इथं एका चित्रपटाचं शूट करत होता. नकुशी मालिकेतला रणजितभाई आल्याचं कळताच फॅन्सही शूटिंगच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांना रणजित भाईला म्हणजे उपेंद्रला भेटायचं होतं. मात्र, उपेंद्र चित्रीकरणात व्यस्त होता. त्यामुळे फॅन्सनी 'रणजितभाई' 'रणजितभाई' म्हणून हाका मारण्यास सुरुवात केली. अनेकदा विनंती करूनही फॅन्स थांबण्यास तयार नव्हते. या गोंधळात शूटिंग करणं शक्य नसल्यानं तीन वेळा शूटिंग थांबवावं लागलं. अखेर, फॅन्सच्या मागणीनुसार स्वत: उपेंद्रनं त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांचं समाधान झालं आणि वातावरण शांत झालं.
 
एकीकडे प्रत्यक्ष भेटण्यासाठी फॅन्सची गर्दी झालेली असताना सोशल मीडियातही रणजितभाई लोकप्रिय आहे. स्टार प्रवाहच्या फेसबुक पेजवरील वर 'रणजितभाईला राग येतो तेव्हा' या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.