विद्या बालन राजकारणात! 

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

"तुम्हारी सुलू'मध्ये संवेदनशील गृहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन आता लवकरच राजकारणात उतरतेय. म्हणजे खऱ्याखुऱ्या नाही तर 70 एमएम पडद्यावर ती एका बड्या महिला नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात विद्या मुख्य भूमिका साकारण्याची शक्‍यता आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर त्यासंदर्भातील माहिती पोस्ट केलीय.

"तुम्हारी सुलू'मध्ये संवेदनशील गृहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन आता लवकरच राजकारणात उतरतेय. म्हणजे खऱ्याखुऱ्या नाही तर 70 एमएम पडद्यावर ती एका बड्या महिला नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात विद्या मुख्य भूमिका साकारण्याची शक्‍यता आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर त्यासंदर्भातील माहिती पोस्ट केलीय. त्यात म्हटलंय की, सिद्धार्थ रॉय-कपूर आणि विद्या बालन प्रॉडक्‍शनसोबत माझं पुस्तक "इंदिरा, इंडियाज मोस्ट पॉवरफुल पीएम'च्या अधिकारासंदर्भात करार करण्यात आलाय. माझ्या पुस्तकावर आधारित चित्रपटात विद्या इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे अन्‌ त्याबाबत मी फारच उत्सुक आहे... सागरिका यांच्या मेसेजवरून इंदिराजींची भूमिका विद्या साकारणार असल्याच्या वृत्ताला दुजोराच मिळतोय. 

Web Title: vidya balan politics