"हॅम्पर'मध्ये आहे तरी काय? 

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

करण जोहरच्या "कॉफी विथ करण' या टॉक शो मध्ये सेलिब्रेटी नेहमीच त्याच्याकडून मिळणाऱ्या गिफ्ट हॅम्परसाठी वेडे होत असताना आपण पाहिलंय. प्रेक्षकांना नेहमीच असं वाटत असेल हे सेलिब्रेटी एवढे श्रीमंत असून एका गिफ्ट हॅम्परसाठी का एवढे वेडे होतात. असं काय आहे या हॅम्परमध्ये? तुम्हालाही प्रश्‍न पडला आहे ना? या प्रश्‍नाचं उत्तर खुद्द करण जोहरनेच कॉफी विथ करणच्या पाचव्या सीझनच्या एका भागात अनवधानाने दिलं.

करण जोहरच्या "कॉफी विथ करण' या टॉक शो मध्ये सेलिब्रेटी नेहमीच त्याच्याकडून मिळणाऱ्या गिफ्ट हॅम्परसाठी वेडे होत असताना आपण पाहिलंय. प्रेक्षकांना नेहमीच असं वाटत असेल हे सेलिब्रेटी एवढे श्रीमंत असून एका गिफ्ट हॅम्परसाठी का एवढे वेडे होतात. असं काय आहे या हॅम्परमध्ये? तुम्हालाही प्रश्‍न पडला आहे ना? या प्रश्‍नाचं उत्तर खुद्द करण जोहरनेच कॉफी विथ करणच्या पाचव्या सीझनच्या एका भागात अनवधानाने दिलं. सूत्रांनुसार "कॉफी विथ करण'च्या या गिफ्ट हॅम्परमध्ये ब्राऊनी, कॉफी मग, हेल्थ बार, हवेत तरंगणारे स्पीकर, रोस्टेड कॉफी, कॉफी फ्रेंच प्रेस, नॉरडिक कॅन्डी, क्‍लिन्झिंग पेस्ट, पाच लाखाचे वॉवचर, हेल्थ जार, चॉकलेट, शॅम्पेन, कुकीज, चीज प्लॅटर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. ऐकून हैराण झालात ना? मग का नाही सेलिब्रेटी या गिफ्ट हॅम्परसाठी वेडे होणार? 

Web Title: What's In a Hamper? Karan Johar Finally Reveals on KWK'

टॅग्स