झहीर खान कोणत्या मराठी अभिनेत्रीला डेट करतोयं?

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

पणजी : क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या जोड्यांची चर्चा काही कमी नाहीत. या दोनही क्षेत्रांना मिळणारी प्रसिध्दी बघता हे त्यांच्या चाहत्यांना नवे नाही. ताजे उदाहरण द्यायचे झाले तर सिक्‍सर किंग युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच, विराट कोहली- अनुष्का शर्मा, शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान पतौडी.

एका खासगी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, या यादीत आणखी एका जोडीचे नाव येण्याची शक्‍यता आहे. झहीर खान आणि चक दे इंडिया फेम अभिनेत्री सागरिका घाटगे एकमेकांना डेट करत असल्याचे दिसत आहे. युवराज सिंगच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहण्यात आले. तेव्हा हे दोघे हातात हात घालून फिरत होते. त्यामुळे या सोहळ्यात त्यांच्यावरही उपस्थितांचे लक्ष होते.

क्रिकेटर- अभिनेता अंगद बेदीची सागरिका फार जवळची मैत्रिण आहे. यांची ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती. झहीर-सागरिका आपल्या नातेसंबंधांबद्दल लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्‍यता आहे.सागरिकाने "चक दे' चित्रपटानंतर मराठी चित्रपट "प्रेमाची गोष्ट' यांत अतुल कुलकर्णी यांच्यासोबत काम केले होते.

झहीर हे पहिल्यांदा नाही तर याआधी झहीर अभिनेत्री ईशा शर्वणीला डेट करत होता. युवराज सिंग आणि हेजल कीच यांचे गोव्यामध्ये लग्न झाल्यानंतर संध्याकाळी रिसेप्शनही झाले. यावेळी बॉलिवूड आणि क्रिकेट विश्‍वातील त्याचे जवळचे मित्र मैत्रिणींचा समावेश होता. यांत झहीर खान आणि सागरिका घाटगे उपस्थित होते.