औरंगाबाद विभागाचा बारावीचा 89.83 टक्के निकाल

सुषेन जाधव
मंगळवार, 30 मे 2017

  • यंदाही मुलींनीच मारली बाजी
  • गतवर्षीच्या तुलनेत निकाल 2.90 टक्‍क्‍यानी वाढला

औरंगाबादः राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी (ता. 30) बारावीचा निकाल लागला. यात औरंगाबाद विभागाचा निकाल 89.83 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल परभणी जिल्ह्याचा (90.59 टक्के) लागला आहे. ही माहिती बोर्डाचे विभागीय अध्यक्ष शिशीर घोनमोडे यांनी दिली.

विभागातून 1 हजार 110 विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 369 परिक्षा केंद्रावर ही परिक्षा घेण्यात आली होती. विभागातून यंदाही मुलींनीच बाजी मारली असून औरंगाबाद जिल्ह्यातून सर्वात जास्त म्हणजेच 93.30 टक्के मुलींचे उतीर्ण होण्याचे प्रमाण आहे.

जिल्हानिहाय निकाल

जिल्हा उतीर्ण विद्यार्थी टक्केवारी
औरंगाबाद 53 हजार 538 89.76 टक्के
बीड 33 हजार 622 90.49 टक्के
परभणी 19 हजार 984 90.59 टक्के
जालना 23 हजार 094 88.49 टक्के
हिंगोली 11 हजार 194 89.62 टक्के

एकूण विद्यार्थी 1 लाख 41 हजार 432 विद्यार्थी टक्केवारी 89.83

औरंगाबाद जिल्हा
वर्ष टक्केवारी

2014 90.98
2015 91.75
2016 87.82
2017 89.83

कॉपी प्रकरणी 2212 विद्यार्थ्यावर कारवाई
यंदा विभागातून 222 कॉपी प्रकरणे झाली. यापैकी विभागीय मंडळ औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांची समितीमार्फत चौकशी करण्यात आली. काही विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यानंतर आठ दिवसांच्या फरकानंतर दुसरी संधीही देण्यात आली. यातून 212 विद्यार्थ्यांवर त्यांच्या चुकीनुसार कारवाई करण्यात आल्याचेही श्री. घोनमोडे म्हणाले. समितीच्या अहवालानुसार 10 विद्यार्थी निर्दोष असल्याचे समोर आल्यानंतर त्याचे निकाल जाहिर केले असून उर्वरित दोषी विद्यार्थ्यांसह अन्य 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :