माजी मंत्री पंडित, आमदारांसह २८ जणांविरोधात गुन्हे

सुहास पवळ
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

गढी (ता. गेवराई) येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने २००५ साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्जापोटी जमीन तारण ठेवली होती. मात्र, कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेकडे तारण ठेवलेली जमीन परस्पर हस्तांतरित केली.

बीड : जिल्हा बँकेचे जयभवानी सहकारी साखर कारखान्याकडे थकित असलेले कर्ज आणि कर्जापोटी तारण दिलेली जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून सोमवारी मध्यरात्री माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आमदार अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित यांच्यासह २८ जणांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, पंडित यांच्यावरील गुन्ह्याच्या निषेधार्थ गेवराईतील बाजारपेठ बंद आहे. 

गढी (ता. गेवराई) येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने २००५ साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्जापोटी जमीन तारण ठेवली होती. मात्र, कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेकडे तारण ठेवलेली जमीन परस्पर हस्तांतरित केली. यावरुन बँकेने गेवराई पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन  माजी मंत्री शिवाजीराव पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार अमरसिंह पंडित, कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह पंडित, पाटीलबा मस्के, दत्तात्रय येवले,  शिवाजी वावरे, अनिरुद्ध लोंढे, श्रीराम आरगडे, भागवत वेताळ, अशोक थोपटे, बप्पासाहेब तळेकर, राजेसाहेब पवळ, शिवाजीराव नावडे, शब्बीर शेखख महेमुद पटेल, अप्पासाहेब खरात, रमेश जाजु, केशवराव औटी, विठ्ठलराव शेळके, पंडित खेत्रे, कुमार ढाकणे, मदनराव घाडगे, शोभा चव्हाण, महानंदा चाळक, सुमन गोर्डे, शेषराव सानप, एस.एन.जोशी, अशोक पानखेडे आदींवर गुन्हा नोंद झाला.

गेवराईत बंद
दरम्यान, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळ पासून गेवराईत बंद पाळला जात आहे. शहरातील बहुतांशी दुकाने बंद ठेवली आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :