बीड: बिंदुसरेवरील पर्यायी रस्ताही गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

इंग्रज राजवटीत अंबाजोगाई येथील सैन्य तुकडीला ये जा करण्यासाठी 78 वर्षांपूर्वी उभारलेला पूल कमकुवत झाल्याने यावरील वाहतूक बंद ठेवली होती.

बीड - धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरील पूल कमकुवत झाल्याने वाहतुकीसाठी  बनवलेला पर्यायी रस्ता आणि पुलही सोमवारी (ता 12) पहाटे खचला.

खचलेल्या पुलात टेम्पो कोसळून दोघे जखमी झाले. दरम्यान मोठा पूल कमकुवत असून पर्यायी रास्त्याची अशी वाताहत झाल्याने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रश्न ऐरणीवर आला आहे.

इंग्रज राजवटीत अंबाजोगाई येथील सैन्य तुकडीला ये जा करण्यासाठी 78 वर्षांपूर्वी उभारलेला पूल कमकुवत झाल्याने यावरील वाहतूक बंद ठेवली होती. धुळे, औरंगाबादहून येणारी वाहने इकडे माजलगाव किंवा चुंबळीहून मांजरसुमबा अशी वळवली होती. त्यामुळे 30 ते 50 किलोमीटरचे अंतर वाढत होते. दरम्यान, या पुलाची नव्याने बांधणी करण्याला मंजुरी मिळाली व तात्पुरता पर्यायी रस्ता आणि पूल उभारण्यात आला. मात्र, रविवारी रात्री जोरदार पाऊस येऊन सोमवारी पहाटे बिंदुसरा नदीला पाणी वाहू लागले. यामध्ये पर्यायी रस्ता आणि पूल खचला. यामध्ये टेम्पो पलटी झाला. दरम्यान, वाहतूक पर्याय शोधण्यासाठी आज दुपारी, महसूल, पोलीस व बांधकाम विभागाचे बैठक होणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता
#स्पर्धापरीक्षा - 'उडान योजना'​
पुण्यातील ‘ग्रॅंड’ गणेशोत्सव पर्यटनाचा ‘ब्रॅंड’ व्हावा!​
‘राहुल चमू’समोर मोठे आव्हान​
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी​