किनवटमध्ये पाच लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

मांडवी परिसरात विशेष पथकाची कारवाई

नांदेड : जिल्ह्यात तेलंगणा अाणि कर्नाटक राज्यातून माेठ्या प्रमाणात गुटख्याची महाराष्ट्रात तस्करी केली जात अाहे. अनेक टाेळ्या सक्रीय अाहेत. गुटखा तस्करांवर कितीही कारवाई केली तरीही गुटखा तस्करीचे प्रमाण कमी हाेताना दिसत नाही.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी येथे पाेलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने तेलंगणातील अादीलाबाद येथून एमएच ४०-केआर-८८८१ या कारमध्ये येणारा पाच लाखाचा गुटखा जप्त केला अाहे. या प्रकरणात गुटख्याची तस्करी करणारे सय्यद जाकीर सय्यद पाशा, शेख अजगर शेख फकीर या दाेन अाराेपींना पाेलिसांनी अटक केली अाहे. तर शेख अारीफ शेख जफार हा फरारी झाला अाहे.

या तिघांविरुध्द मांडवी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. दरम्यान गेल्या कांही दिवसांत गुटखा तस्करांवर पाेलिसांच्या विशेष पथकाने अनेक कारवाई केली अाहे. मात्र, अवैध गुटखा विक्री राेखण्यात प्रमुख भुमिका असलेल्या अन्न व अाैषध प्रशासन स्वतः हून एकही कारवाई केली जात नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे..

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या
आता शाळा सुटेल, पण पाटी फुटणार नाही; 'खापराची' पाटी होतेय गायब
द. चिनी समुद्रात अमेरिकेची लढाऊ विमाने;चीनला थेट आव्हान

विक्रीतील मध्यस्थ हटवून वाढवला शेतीतील नफा
वयाच्या पंचाहत्तरीतही मुख्याध्यापक झाले विद्यार्थी
मेरे बस में होता, तो बुऱ्हान वणीको जिंदा रखता: काँग्रेस नेता