मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 जुलै 2017

मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसाह्य योजनेअंतर्गत आज मराठी चित्रपट निर्मात्यांना अनुदान प्रदान करण्यात आले. या वेळी विविध चित्रपट संस्थेचे निर्माता आणि दिग्दर्शक उपस्थित होते.

चित्रपट निर्मितीस अर्थसाह्य करतानाच यापुढे मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अर्थसाह्य करण्याबाबत विचार करता येईल का, याबाबतचे मत आणि भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी जाणून घेतली. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोचविण्यासाठी आणि चित्रपटांची पायरसी थांबविण्याच्या दृष्टीने काही कायदेशीर पावले उचलण्याबाबत राज्य सरकार सहकार्य करेल, असेही तावडे यांनी सांगितले. 

मराठी चित्रपट खेड्यापाड्यांत आणि प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्या चित्रपटाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसार करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करेल असेही, तावडे यांनी सांगितले. राज्य सरकार म्हणून मराठी चित्रपट सृष्टीच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देतानाच चित्रपट निर्माता, दिग्दर्शकांनी सरकारकडून आपल्या नेमक्‍या काय अपेक्षा आहेत व चित्रपट अधिक रसिकांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने त्यांचे विचार तावडे यांनी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ऐकून घेतले.