विक्रोळीतील प्रसिद्ध नर्तकाची आत्महत्या

Marathi News vikhroli's famous dancer suicides
Marathi News vikhroli's famous dancer suicides

विक्रोळी - व्यवसायाने नर्तक असलेल्या एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कन्नमवार नगरातील इमारत क्रमांक 88 येथे गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. संजोत घाग (वय 27) याने घरात कोणी नसताना स्वत:चे जीवन संपविले. 

रात्री 8 च्या सुमारास त्याची आई घरी आली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. घरात असलेला संजोत दरवाजा का उघडत नाही, यासाठी खिडकीतून पाहिले असता संजोत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर तातडीने शेजारी आणि त्याच्या मित्रांना बोलावण्यात आले. दरवाजा तोडून पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात संजोतला नेण्यात आले. त्याआधीच तो मरण पावला होता. ही बातमी पसरताच रुग्णालयाजवळ संजोतच्या आप्तस्वकीयांनी गर्दी केली होती. 

संजोत हा एक चांगला नर्तक होता. त्याची स्वतःची सिल्व्हर स्टेपर्स नावाची नृत्य अकादमी होती. विक्रोळी परिसरात नर्तक म्हणून तो प्रसिद्ध होता. दूरचित्रवाहिनीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या डान्स शोमध्ये संजोतच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या ग्रुपने सहभाग घेतला होता. मनमिळाऊ असलेल्या संजोतने टोकाचे पाऊल का उचलले हेच समजले नाही, असे त्याचा मित्र तन्मय कांबळे याने सांगितले. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही, तपास सुरू आहे असे विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com