मोरोशी भैरवगडाची कठीण 450 फूट प्रस्तर भिंत 10 तासांत सर

ठाणे जिल्ह्यातील माळशेज येथील भैरवगड (मोरोशी) किल्ल्याची ऊंची 4000 फूट आहे.
मोरोशी भैरवगड
मोरोशी भैरवगडSakal

पाली : सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील प्रसिद्ध प्रस्तरारोहक व मॅकवीला द जंगलयार्ड चे संस्थापक मॅकमोहन हुले व त्यांचे सहकारी आयुष सिंग यांनी नुकतेच मोरोशी भैरवगडाची कठीण 450 फूट प्रस्तर भिंत 10 तासांत सर केली आहे. या अवघड चढाईत अनेक जण माघारी फिरतात मात्र जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या दोघांनी ही मोहीम फत्ते केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील माळशेज येथील भैरवगड (मोरोशी) किल्ल्याची ऊंची 4000 फूट आहे. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या ४५० फूट उंच, सरळसोट भिंतीवर वसलेला आहे. त्यामुळे यावरची चढाई अत्यंत कठीण श्रेणीमध्ये येते.

मॅकमोहन हुले यांनी सकाळला सांगितले की भैरवगड पश्चिमेकडील प्रस्तर भिंतीची संपूर्ण माहिती मिळताच आम्ही मोहीम आखली. दुपारी बॅकअप टीम म्हणून मंगेश कोयंडे यांच्याशी संपर्क केला आणि काही साधने सोबत घेतली. जवळपास दोनशे लिटर बॅकपॅक असा प्रवास दोघांनी कारने केला. सोमवारी (ता.16) रात्री मोरोशी या गावात पोहोचलो. सोमवारी (ता.17) सकाळी पाच वाजता गावातून एक गाईड घेतला आणि ट्रेक चालू केला. नियोजनानुसार प्रस्तर भिंतीच्या पायथ्याला पोहोचलो.

प्रस्तर भिंत ही ८० अंश कोणात असून ४५० फूट असा प्रस्तर मार्ग ६३ बोल्टचा वापर केला आहे. चारही बाजूंनी सोसाट्याचा वारा वाहत होता. उंचीवर ऐकायला येणं शक्य नसतं, खूप मेहनत कसोटी लागते. वर चढत असतांना वेळही वाया जातो. म्हणून काही लोक ही मोहीम अर्ध्यातच सोडून जातात. आम्ही ही मोहीम खूप जिद्दीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असे मॅकमोहन म्हणाले. ईथे टोकावर जाण्यासाठी कोणताही बोल्ट नाही. ७० अंश कोणातच १०० फूट मातीचा घसरडी अशी चढाई आहे. सोमवारी (ता.17) सकाळी नऊ वाजता प्रस्तरारोहणाला सुरुवात केली ते सायंकाळी सात वाजता म्हणजे तब्बल 10 तासांनी अंतिम टोकावर पोहचले. या चढाईत दोघांचीही कसोटी लागली.

मोरोशी भैरवगड
रायगड : प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी सर केला 300 फूट नागफणी कडा

सर्व मोहिमांचा अभ्यास, पाठपुरावा आणि दिग्गज गिर्यारोहकांच्या मदतीने आम्ही अवघड मोहिमा फत्ते करतो. जगातला सर्व उंच शिखर सर करण्याचे आमचे स्वप्न आहे. सह्याद्रीतील सर्वात उंच उंच सुळके, प्रस्तर भिंती आम्ही सुरक्षित आरोहण करत आहोत. ही सर्व प्रसार माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हेच आमचे उद्दिष्ट आहे.

- मॅकमोहन हुले, प्रस्तरारोहक, सुधागड

या आधीच्या मोहिमा

मॅकमोहन हुले यांनी सांगितले की भैरवगडावर पहिली चढाई वीस वर्षांपूर्वी झालेली आहे. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१२ मध्ये हा पारंपारिक चढ़ाईतील मार्गावर सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह (SCI) आणि दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्था पुणे यांच्याकडून एम.जी बोल्ट मारण्यात आले. अशी माहिती दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था पुणेचे सदस्य गोपाल भंडारी सदस्य व सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्हचे सदस्य अमोल रणदिवे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com