मुंबई: क्रिकेटच्या बॅटने केली भावाची हत्या

अनिष पाटील
रविवार, 2 जुलै 2017

दादर पूर्व येथील नायगाव परिसरात शनिवारी रात्री पावणाबाराच्या सुमारास ही घटना घडली. आईच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : घर खर्चाला पैसे दिले नाही, म्हणून मोठ्या भावाने धाकट्या भावाच्या डोक्यात क्रिकेटची बॅट मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना दादर भागात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर पूर्व येथील नायगाव परिसरातील न्यू बीडीडी चाळ नंबर 5 मधील खोली क्रमांक 50मध्ये शनिवारी रात्री पावणाबाराच्या सुमारास ही घटना घडली. आईच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मृत व्यक्तीचे नाव मुकेश माकवाना (वय 27) असे असून, या प्रकरणी अद्याप त्याच्या भावाला अटक करण्यात आलेली नाही. मुकेशची आई मधुबाई माकवाना (वय 75) यांनी तक्रार दिली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा ऍसिड हल्ला
गोमांसावरून हत्येप्रकरणी भाजप नेत्याला अटक​
चंद्रपूर: खासगी बसला अपघात, 20 जण जखमी​
दोनही हातांनी वाजलेली टाळी​
जमावाच्या हल्ल्यांनी राष्ट्रपती चिंतित​
महिला क्रिकेटमध्ये आज भारत-पाक लढत​
जोड नसलेला उदारमतवाद​
#स्पर्धापरीक्षा - गुरुत्वीय लहरीचा संशोधनात्मक प्रयोग​
मोदी-ट्रम्प भेटीचं फलित (श्रीराम पवार)​
शापित देवभूमीला शांततेची आस (किशोर जामकर)​