कल्याण : सृष्टी मृत्यू प्रकरण; पाच वर्षांनी अखेर तिघा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

police fir
police firsakal media

कल्याण : कल्याणमध्ये सहा वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी (Six year daughter death) तिघा डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल (Police fir filed) करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे (Doctors irresponsibility) मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे वडील अभिजीत सोनावणे यांनी केला होता. याबाबत त्यांनी कल्याण न्यायालयात (kalyan court) दावा दाखल केला होता. पाच वर्षांनी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने अखेर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाण्यात (Kolsewadi police station) गुन्हा दाखल झाला आहे.

police fir
मोखाडा : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासींना प्यावे लागले चिखलाचे पाणी!  

कल्याण पूर्वमध्ये राहणारे अभिजीत सोनावणे यांची सहा वर्षीय मुलगी सृष्टी हिला ऑक्टोबर २०१८ मध्ये अचानक ताप आल्याने कल्याणमधील साई विनीत चिल्ड्रन रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉ. नितीन कोकरे, डॉ. रोहन मडगुळ यांनी मुलीवर उपचार सुरू केले. विविध चाचण्या केल्या असता `वातावरण बदलामुळे ताप आहे, काळजी करण्याचे कारण नाही` असे डॉक्टरांनी सांगितले. पाच दिवसांनंतर मुलीची तब्येत खालावली. डॉ. कोकरे, डॉ. मडगुळ यांनी मुलीला डेंगी झाला असून तिची तब्येत गंभीर असल्याने अन्य रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तिच्या पालकांनी त्वरित तिला कल्याण पश्चिममधील रॉयल चिल्ड्रन रुग्णालयात दाखल केले. मात्र ११ ऑक्टोबरला रात्री उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, सृष्टीच्या कुटुंबीयांनी हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईसाठी पोलिस ठाण्यावर मेणबत्ती मोर्चा काढला होता; मात्र न्याय मिळाला नसल्याने अखेर अभिजीत सोनावणे यांनी कल्याण न्यायालयामध्ये धाव घेत आपल्या मुलीचा मृत्यू डॉक्टर वर्गाच्या हलगर्जीमुळे झाल्याची तक्रार दाव्याद्वारे केली. तक्रारीची दखल घेऊन कल्याण न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील तपास सहपोलिस निरीक्षक एस. पी. डोके करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com