महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. पायाचं दुखणं वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कोरोनाची लागण झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आज दुपारी ते लिलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. (Raj Thackeray hip bone surgery)
राज ठाकरेंवर (Raj Thackeray) उद्या हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी ते आजच दुपारी काही चाचण्यांसाठी लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल होतील. आज या चाचण्या होतील आणि उद्या शस्त्रक्रिया पार पडेल. या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
या आधी जूनच्या सुरुवातीला शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाचा अंश आढळून आला. त्यामुळे त्यांना भुलीचं इंजेक्शन देणं शक्य नव्हतं. म्हणून ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. हे दुखणं वाढल्यामुळे मे महिन्यातला आपला पुणे दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईत परतले होते. ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरासुद्धा (Raj Thackeray Ayodhya Visit) यामुळे स्थगित करावा लागला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.