प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून तरुणाने आत्महत्या केल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मध्ये राहणारा 29 वर्षीय हनी असवानी हा व्यापा-याचा मुलगा. हनी आणि नालासोपारा येथे राहणा-या तरुणीचे पाच सहा वर्षा पासून प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी त्यांच्यात वाद झाल्याने त्यांचे प्रेम संबंध तुटले. दोघांच्याही घरच्यांनी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न ठरवले. 2 जुलै रोजी हनीचे लग्न होणार होते तर आज (सोमवारी) तरुणी लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे.

उल्हासनगर : प्रेम प्रकरण तुटल्यानंतर व घरच्यांनी दोघांचे लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरवल्यावर उल्हासनगरातील तरूणाने प्रेमीकेला व्हिडीओ कॉल करुन लाईव्ह आत्महत्या केल्याची घटना महिन्यानंतर उघडकिस आली आहे. याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे आज सोमवारी ही तरुणी लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मध्ये राहणारा 29 वर्षीय हनी असवानी हा व्यापा-याचा मुलगा. हनी आणि नालासोपारा येथे राहणा-या तरुणीचे पाच सहा वर्षा पासून प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी त्यांच्यात वाद झाल्याने त्यांचे प्रेम संबंध तुटले. दोघांच्याही घरच्यांनी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न ठरवले. 2 जुलै रोजी हनीचे लग्न होणार होते तर आज (सोमवारी) तरुणी लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे.

''महिन्यापूर्वी हनी आणि तरुणीची भेट झाली. त्यांच्यात भांडण झाल्यावर 21 मे रोजी हनीने आत्महत्या केली. त्याने गळफास घेण्यापूर्वी तरुणीला व्हिडिओ कॉल केला. आत्महत्या करत असल्याच्या तो म्हणाला. तिने त्याला आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला नाही. 'आत्महत्या करुन दाखव,' असे तरुणीने म्हटल्यावर हनीने आत्महत्या केली," अशी खळबळ जनक तक्रार हनीचे वडील नरेश आसनानी यांनी आज हिल लाईन पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार तरुणीवर आत्महत्तेस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

यासंदर्भात हिल लाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता, हनीने व्हिडिओ कॉल करुन लाईव्ह आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली आहे, असे सांगितले. त्यानुसार तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा व्हिडिओ कॉल नीट दिसत नाही.तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असून व्हिडिओ नीट दिसल्यावर पुढील तपास करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील आणखी वाचा

sarkarnama.in : विशेष बातम्या

आज दिवसभरात... (ई सकाळ व्हिडिओ बुलेटिन)