‘प्रज्ञान’चा तळमळीचा प्रयोग!

‘प्रज्ञान’चा तळमळीचा प्रयोग!

वारणानगर परिसरात नाट्य आणि चित्रपट साक्षरतेसाठी अग्रेसर असलेल्या प्रज्ञान कला अकादमीने यंदाच्या स्पर्धेसाठीही प्रा. दिलीप जगताप यांचीच ‘दलदल’ संहिता निवडली आणि त्याच तळमळीने प्रयोग सादर केला.

मानवी भावभावना, वर्तमान आणि सामाजिक परिस्थिती अशा अनुषंगाने प्रा. जगताप लिखाण करीत असतात आणि तो विषय मांडताना अनेक गुंतागुंतीही त्या संहितेतून सोडवण्याचा प्रायोगिक प्रयत्न करतात आणि ‘प्रज्ञान’सारख्या टीम त्या आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतात. 

समुद्र मुजोरपणाने नदीवर आक्रमण करतो आणि येते एक साचलेपण, या मध्यवर्ती सूत्रावर नाटकाचं कथासूत्र त्यांनी बांधलं आहे. आलू आणि माकुरी हे दलदलीत राहणारं दाम्पत्य. त्यांच्या जुळ्या मुलांपैकी एक मुलगा गावातील उतरंड मोडीत काढून शहरात गेला आहे. तो कदाचित हयात नसावा, अशी त्यांची शंका आहे. त्यांचा दुसरा मुलगा इरू लग्नानंतर बायकोच्या आग्रहाखातर शहरात पैसे कमविण्यासाठी गेला आहे. 

कालूया गावातला नागदेवतेचा पुजारी, आंधळा 
भिकारी अशा सगळ्या पात्रांची ही गोष्ट. एकूणच अन्यायाविरोधातील चीड नाटकातून वारंवार व्यक्त होत राहते. दिग्दर्शक पद्मनाभ पोवार आणि त्यांची टीम नाटक तितक्‍याच तळमळीने सादर करतात. २०१५ मध्ये ‘प्रज्ञान’च्या टीमनं राज्य नाट्य स्पर्धेत दमदार एंट्री करीत प्रा. दिलीप जगताप यांचेच ‘आला रे राजा’ नाटक सादर केले होते. त्या वेळी वैयक्तिक चार बक्षिसांसह दुसऱ्या क्रमांकावरही मोहोर उमटवली होती. गेल्या वर्षीही प्रा. जगताप यांचेच ‘पूज्य गुरुजी’ नाटक सादर केले होते. 

पात्र परिचय
 अनिकेत ढाले (माकुरी), नीलेश आवटी (भिकारी), विकास मिनेकर (मांत्रिक), सौरभ कदम (इरू), स्नेहल कुलकर्णी (आलू), केदार सोनटक्के, अमर्त्य पोवार, प्रवीण वरेकर (सेवक).
 दिग्दर्शक - पद्‌मनाभ पोवार
 प्रकाश योजना- विनायक सुतार
 संगीत- केदार सोनटक्के
 नेपथ्य- मंगेश कांबळे
 रंगभूषा- नेहा आवटी
 वेशभूषा- रश्‍मी सोनटक्के
 निर्माता- रमेश हराळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com