कन्हैया कुमारच्या सभेबाबत संभ्रम कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर: जेएनयूच्या स्टुडंट युनियनचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारच्या सभेबाबत संभ्रम अद्याप कायम आहे. कन्हैया कुमारच्या कोल्हापुरात होणाऱ्या सभेला अजूनही पालिकेने परवानगी दिलेली नाही.

कन्हैया कुमार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. रविवारी (ता. 5) त्याची नाशिकमध्ये सभा झाली. कोल्हापुरात नाट्यगृहात त्याची सभा घेण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. पण पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय परवानगी देणार नाही, अशी भूमिका पालिकेने घेतली. दरम्यान, हिंदुत्ववाद्यांचा या सभेला विरोध आहे. सभेला पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ही सभा होणार की नाही याबाबत संभ्रम आहे.

नाशिकमध्ये झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय लोटला होता. नाशिकच्या सभेत कन्हैया कुमारने भाजपवर सडकून टीका केली होती. आम्हाला राष्ट्रभक्त किंवा देशद्रोह्याच्या कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही असे, विधानही कन्हैया कुमारने केले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :