वधू-वर सूचक केंद्राविरुद्ध फ्लॅटमालक कंपनीचा न्यायालयात खटला

वधू-वर सूचक केंद्राविरुद्ध फ्लॅटमालक कंपनीचा न्यायालयात खटला

सांगली - लग्नाचे आमिष दाखवून इच्छुक वरांची लाखोंची लुबाडणूक करणाऱ्या उत्तर शिवाजीनगर येथील राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राविरुद्ध फ्लॅटमालक कंपनीने जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. हा फ्लॅट सोडण्यात केंद्रचालक तयार नसल्याने आम्ही न्यायालयात गेलोय, असे कंपनीच्या व्यवस्थापकांनी अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांना लिहून दिले, परंतु या केंद्राशी कोणताही भाडेकरार नसल्याची कबुली त्यांनी दिली.

येत्या दोन दिवसांत केंद्र बंद झाले नाही, तर कंपनी व्यवस्थापकाच्या दारात आंदोलन केले जाईल, असा इशारा अपार्टमेंटमधील नागरिकांनी दिला आहे. 

उत्तर शिवाजीनगरमधील शिव ऑर्नेट अपार्टमेंटमधील क्रमांक ४ चा फ्लॅट परजिल्ह्यातील एका कंपनीच्या नावे आहे. अडीच वर्षांपूर्वी तो राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राला भाड्याने दिला. त्याच्याकडून चुकीची कृत्ये केली जात आहेत, हे लक्षात आल्यानंतर त्याला फ्लॅट रिकामा करण्याची नोटीस दिला. तो ऐकत नाही, हे लक्षात आल्यानंतर न्यायालयात खटला दाखल केला आहे, त्याच्यातारखा सुरू आहेत, अशी माहिती सदर व्यवस्थापकाने दिली; परंतु राजकिशोरला हकलण्यासाठी न्यायालयीन लढ्याची गरज का भासावी, असा प्रश्‍न अपार्टमेंटधारकांना पडला आहे. या प्रकरणात व्यवस्थापक हुलकावण्यात देत असल्याचा संशय व्यक्त करून कंपनीने थेट लक्ष घालावे, कंपनीचे मालक किंवा वरिष्ठांशीच आम्ही बोलू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 

राजकिशोर केंद्रचालकाचा मुलगा आज पुन्हा अपार्टमेंट परिसरात आल्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या मुलाने वृत्तपत्रातील बातम्यांच्या कात्रणांचे डिजिटल फलक काढा, अशी धमकी दिल्याची तक्रार अपर पोलिस अधीक्षकांकडे केल्याचे शिवसेनेच्या रेखा पाटील यांनी सांगितले. शनिवारी शिवसेना नेते पृथ्वीराज पवार यांच्यासमोर हे केंद्र बंद करण्याची तयारी दाखवून एक दिवस उलटला नाही, तोवर पुन्हा हा प्रकार घडल्याने नागरिक संतापले आहेत. 

पोलिस शांत कसे ?
राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राचे प्रकरण इतके तापलेय, त्याच्याविरुद्ध तक्रारदारांची रांग लागलीय, केंद्राला टाळे ठोकण्यापर्यंत प्रकरण गेले तरी विश्रामबाग पोलिसांनी हालचाल का केली नाही, अशी चर्चा आता पुढे येत आहे.

संबंधीत बातम्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com