वनविभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्याचा बछडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

आठवडाभर बिबट्या मादीचा दोन पिलांसहीत वावर आहे. काल त्याने नागरी वस्तीत घुसण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याची दहशत होती. ती कायम आहे. वनविभागाने काल रात्री तेथे पिंजरा लावला होता. त्यात बछडा सापडला.

कऱ्हाड : वाठार येथील वाठारकर मळ्यात वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबट्याचा बछडा सापडला. मंगळवारी रात्री भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बछडा सापळ्यात आला. अद्यापही मादी व एक बछडा सापडलेला नाही.

आठवडाभर बिबट्या मादीचा दोन पिलांसहीत वावर आहे. काल त्याने नागरी वस्तीत घुसण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याची दहशत होती. ती कायम आहे. वनविभागाने काल रात्री तेथे पिंजरा लावला होता. त्यात बछडा सापडला. अद्यापही मादी व दुसऱ्या बछड्याचा शोध सुरू आहे. पिंजऱ्यात सापडलेला बछडा वन विभागाकडून सुरक्षितस्थळी नेण्यात आले.

काले जुजारवाडी वाठार रस्त्याच्या कडेला असलेल्या संजय साळवे, तानाजी माने व सर्जेराव कांदेकर यांच्या वस्ती परीसरात दोन बिबट्याची पिल्ले फिरताना चार दिवसापासून दिसत आहेत. येथील कांदेकर यांचे रेडकू व जुजारवाडी येथील अधिकराव पाटील यांचे कुत्रे बिबट्याचे फस्त केले आहे. तर दोन दिवसापासून मानेंच्या वस्ती शेजारील ऊसाच्या शेतात बिबटे वावरत आहे. शेतातून जनावरासाठी वैरण आणण्यासाठी गेलेल्या अनिता साळवे यांच्या दिशेने बांधावर बसलेल्या बिबट्याने झेप घेतली. मात्र त्याच वेळी तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आरडा आेरड केल्याने बिबट्याची झेपे पासून त्यांचा जीव वाचला होता. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :