जंक्‍शनमधील माय - लेकाचा मदुराईमध्ये अपघाती मृत्यू

राजकुमार थोरात
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

अपघातात ठार झालेले आसिफ सय्यद याचे पुण्यामध्ये 'मेगा स्ट्रक्‍चरर्स' व सित्तिका सय्यद यांचे जंक्‍शनमध्ये "सुप्रिम इंजिनिअर्स' या नावाने वर्कशॉप आहेत.

वालचंदनगर : जंक्‍शन (ता. इंदापूर) येथील युवा उद्योजक आसिफ फैजुद्दीन सय्यद (वय 27) व त्यांच्या आई सित्तिका फैजुद्दीन सय्यद (वय 46) या दोघांचा तमिळनाडू राज्यातील मदुराई येथे झालेल्या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातामध्ये सय्यद कुटुंबातील सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये फैजुद्दीन अजीज सय्यद (वय 55), जावेद फैजुद्दीन सय्यद (वय 25), रमिज फैजुद्दीन सय्यद (वय 20), रेश्‍मा फैजुद्दीन सय्यद (वय 16), नाजनीर आसिफ सय्यद (वय 22), सिफा आसिफ सय्यद (वय 2) हे किरकोळ जखमी झाले आहेत. फैजुद्दीन अजीज सय्यद हे जंक्‍शन येथील प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचे जंक्‍शनमध्ये "प्रिसिजन इंजिनिअर्स' हे वर्कशॉप आहे. तसेच अपघातात ठार झालेले आसिफ सय्यद याचे पुण्यामध्ये "मेगा स्ट्रक्‍चरर्स' व सित्तिका सय्यद यांचे जंक्‍शनमध्ये "सुप्रिम इंजिनिअर्स' या नावाने वर्कशॉप आहेत.

फैजुद्दीन सय्यद यांचे मूळ गाव तमिळनाडूमधील मदुराई असून, ते दरवर्षी दिवाळीसाठी गावी जातात. या दिवाळीला ते 19 ऑक्‍टोबर रोजी मुदराईला गेले होते. मंगळवारी (ता. 24) जंक्‍शनकडे निघाले असताना मदुराईपासून 200 किलोमीटर अंतरावर तरमती नामकल या गावाजवळ कुत्रे आडवे आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने पाच पलट्या घेतल्या. त्यात दोघांचा मृत्यू झाला; तर इतर सहा जण जखमी झाले आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :