गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात आरोपीस शिक्षा

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

दौंड (पुणे): दौंड रेल्वे स्थानकावर चोरी करताना पकडण्यात आलेल्या एका चोरट्याला तीन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दौंड (पुणे): दौंड रेल्वे स्थानकावर चोरी करताना पकडण्यात आलेल्या एका चोरट्याला तीन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे नाईक संजय पाचपुते यांनी आज (ता. ७) या बाबत माहिती दिली. दादा किसन कोलटकर (रा. काष्टी, ता. श्रीगोंदे, जि. नगर) हे ११ ऑगस्ट २०१७ रोजी मनमाड-पुणे पॅसेंजरने काष्टी ते दौंड असा रेल्वे प्रवास करीत होते. सदर पॅसेंजर दौंड रेल्वे स्थानक येथे दाखल झाल्यानंतर दादा कोलटकर गाडीतून उतरत असताना शहाजी निवृत्ती जाधव (वय ३०, रा. लांबखेड, जि. बीड) याने त्यांच्या खिशात हात घालून पाचशे रूपयांची नोट काढून घेत पळ काढला होता. श्री. कोलटकर यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानकावर तैनात असलेले संजय पाचपुते यांनी पाठलाग करून संशयित आरोपी शहाजी जाधव यास पकडले होते. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.

दौंड लोहमार्ग न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ओ. एस. पाटील यांनी या खटल्यात आरोपी शहाजी जाधव यास तीन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :