'मिसेस इंडिया अर्थ'मध्ये झळकणार अमळनेरच्या प्रा. डॉ. मोनिका मुंदडा

योगेश महाजन
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

विविध स्पर्धेतील यशातून महिलांना नवीन ओळख मिळत असते. मिसेस इंडिया अर्थ स्पर्धेत पात्र ठरल्याने आत्मविश्‍वास वाढला आहे. पुढील यशासाठी प्रयत्नांची पाराकाष्टा सोडणार नाही.
- प्रा. डॉ. मोनिका मुंदडा, अमळनेर.

स्पर्धेसाठी पात्र; दिल्ली येथे सहा ऑक्‍टोबरला होणार अंतीम स्पर्धा

अमळनेर (जळगाव): मिसेस इंडिया अर्थ 2017-18 स्पर्धेसाठी येथील प्रा. डॉ. मोनिका मुंदडा पात्र ठरल्या आहेत. न्यू दिल्ली येथे सहा ऑक्‍टोबरला आयटीसी वेलकम हॉटेल येथे याची अंतीम स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रा. डॉ. श्रीमती मुंदडा यांनी जिल्ह्यातून प्रथम बहुमान पटकावला आहे. यूट्यूब या संकेतस्थळावर त्यांचा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. सोशल मिडियावर त्यांचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

विवाहित महिलांसाठी मिसेस इंडिया अर्थ ही अनोखी स्पर्धा आहे. केवळ सौंदर्यापेक्षा व्यक्तिमत्व, गुणवत्ता आणि संस्कृती आदी या प्राधान्यक्रमाने येतात. प्रा. डॉ. मुंदडा यांचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे. अमळनेर त्यांचे सासर असून, येथील प्रताप महाविद्यालयात त्या संगणक विभागात व्याख्यात्या आहेत. लग्नानंतर त्यांनी बामू विद्यापीठातून त्यांनी एम. फिल. केले असून, पीएचडीही केली आहे. स्पर्धेसाठी त्यांनी संस्थेकडे ऑनलाइन छायाचित्र व अर्ज केला होता. दूरध्वनीवर त्यांची मुलाखत झाली असून, त्या पात्रही ठरल्या आहेत. त्यांचे वडील भिकमचंद मल औरंगाबाद येथे उद्योजक, तर पती प्रशांत राजू मुंदडा येथे कपड्यांचे ख्यातनाम व्यापारी आहेत.

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल
प्रा. डॉ. मोनिका मुंदडा यांच्या मिसेस इंडियाच्या सहभागाची चित्रफितही (व्हिडिओ) नुकतीच यूट्यूब संकेतस्थळावर प्रदर्शित झाली आहे. सोशल मिडियाच्या फेसबुकवरही त्यांचे लाइक पेज असून, मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. जास्तीत जास्त नेटीझन्सनी पेजला भेट देवून त्यांचा उत्साह वाढविण्याची गरज आहे. त्यांनी या स्पर्धेत मारलेली धडक ही बाब जळगावकरांसाठी निश्‍चितच अभिमानाची आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट