जळगावः कौशल्य व नेतृत्वविकासासाठी सज्ज झाली तरूणाई!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

खानदेशात सिमॅसिस- "यिन' लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचा प्रारंभ

जळगाव: "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'च्या (एसआयएलसी) पुढाकाराने "सिमॅसिस' आणि "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) यांनी लीडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमची घोषणा केली आहे. यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व प्रात्यक्षिकांमधील कौशल्ये शिकविण्यात येणार असून, खानदेशातील या उपक्रमाचा प्रारंभ आज (सोमवार) येथील रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट आणि मु. जे. महाविद्यालयात करण्यात आला.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी सदर प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली.
करीअरच्या चांगल्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने सिमॅसिस- यिन लिडरशिप डेव्हलमेंट प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमाचा आज दुपारी बाराला रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते पोस्टर अनावरण करून झाले. याप्रसंगी प्रा. राज कांकरीया, प्रा. तन्मय भाले, "यिन'चे महाविद्यालय अध्यक्ष विशाल वाणी, उपाध्यक्ष तुलशन हिवाळे, महामंडळ अध्यक्ष अंजली चोरडीया, उपाध्यक्ष धनश्री अग्रवाल, सदस्य हर्षल इंगळे, विजय पाटील, "यिन'चे समन्वयक अंकुश सोनवणे उपस्थित होते. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपक्रमाची माहिती घेत, यामध्ये सहभागी होवून प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शविली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट