चांदोरीत बारा बलुतेदारांच्या श्रीरामाचा जन्म; 400 वर्षांची परंपरा

श्रीरामजन्माचा उत्सव आजमितीला पारंपरिक जोखाडात अडकलेला असताना सर्व जातीधर्मियांचा मिळून एक रामजन्म ही संकल्पना चांदोरी गावाने चारशेहून अधिक वर्षांपासून जपली आहे.
Ram Navmi utsav
Ram Navmi utsavesakal

चांदोरी (जि. नाशिक) : श्रीरामजन्माचा उत्सव आजमितीला पारंपरिक जोखाडात अडकलेला असताना सर्व जातीधर्मियांचा मिळून एक रामजन्म ही संकल्पना चांदोरी गावाने चारशेहून अधिक वर्षांपासून जपली असून, रविवारी (ता. १०) १२ वाजता एका अनोख्या पद्धतीने 'श्रीरामाचा' जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सुतारापासून कुंभारापर्यंत बारा बलुतेदार एकत्र येऊन हा श्रीरामजन्म साजरा करीत असल्याने विषमतेच्या जमान्यात त्याचे वेगळे महत्त्व आहे.

सुतारकाम करणाऱ्या बांधवाने केलेली रथाची जोडणी, कुंभार बांधवाने खास श्रीरामजन्मोत्सवासाठी बनवलेला रांजण आणि नाभिक बांधवाकडून सूर्याला आरसा दाखवून होत असलेला श्रीरामजन्म अशी अनोखी परंपरा चारशे वर्षांपासून चांदोरी गावाने जपली आहे. आजही हा उत्सव मोठ्या थाटामाटाने होणार आहे.

यावनी साम्राज्यात विठ्ठलपंत

बल्लाळ यांना प्रवासादरम्यान संगमनेर, जोर्वे गावाजवळील प्रवरा नदीपात्रात अर्घ्य देताना रामपंचायतनाची ही मूर्ती हातात आली. त्यात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व सिता श्री रामाच्या मांडीवर बसलेल्या अवस्थेत आहे.

Ram Navmi utsav
प्रभु श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श : राज्यपाल कोश्यारी

वरील पंचायतयान घेत काही दिवस पंचवटी (नाशिक) मध्ये राहिले.परंतु या ठिकाणी त्यास मनशांती न मिळाल्याने फिरत फिरत चांदोरी (पूर्वीचे चंद्रावती) गावात आले. या ठिकाणी ध्यान धारणा करण्यास उत्तम वाटल्याने ते येथेच स्थायिक झाले. त्यांचे मंदिर बांधण्याचा विचार करून त्याकाळचे चंद्रावती (आजचे चांदोरी) या गावी मंदिर बांधले. तेच हे श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर दक्षिणाभिमुख असून, पूर्णतः दगडी व सागवानी लाकडात बांधलेले आहे. मठात लाकडी देव्हारा असून, त्यात पितळी पाळण्यात श्रीराम पंचायतन विराजीत आहे. समोरील सभामंडपात काळ्या पाषाणातील दास मारूतीदेखील आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणारा हा उत्सव रामजन्माच्या दिवशी मठाधिपतीच्या रथारूढाने पिंपळपाराला अकरा प्रदक्षिणा घालून सुरू होतो. मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी हे पूर्वीचे बल्लाळ नंतर गोसावी आणि आता मठाधिपती असल्याने मठकरी किंवा मटकरी आहेत.

रामजन्माची अनोखी पद्धत

मंदिराच्या सभागृहात रामपंचायतन पूर्वाभिमुख ठेवले गेले. माध्यान्हीच्या समयी नाभिक समाजाचे मानकरी हातात आरसा घेऊन दूरवर उभे राहिल्यानंतर आरशावर सूर्याचे प्रतिबिंब आले की ती प्रकाशकिरणे श्रीरामचंद्रांच्या मूर्तीच्या मुखकमलावर पडताच श्रीराम जन्म झाल्याचे समजले गेले. मुखकमलावर प्रकाश किरणे पडताच उपस्थित भाविकांकडून गुलाल-खोबरे फुलांची उधळण केली गेली. श्रीरामनामाचा जयघोष होऊन हा जन्मोत्सव साजरा केला गेला.

Ram Navmi utsav
Video: काळाराम मंदिरातील वासंतिक उत्सवाचा उत्साह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com