नाशिक : दिंडोरीत सातव्या जिल्हा परिषद गटाची निर्मिती

ZP Nashik
ZP Nashikesakal

लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात जिल्हा परिषदेचा (ZP) एका गटाची वाढ झाली असून नवीन वरखेडा जिल्हा परिषद गट अस्तित्वात आला आहे. नवीन गटाच्या निर्मितीने अनेक इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातून नवीन नेतृत्व तयार होणार असल्याने गटांच्या निर्मितीने राजकीय पटलावर हालचाली वाढणार आहेत. (Formation of 7th Zilla Parishad Group in Dindori Nashik News)

ZP Nashik
सरकारी शाळांमधील अशासकीय उपक्रमांना चाप; शासनाची घ्यावी लागणार परवानगी

जाहीर झालेल्या प्रारूप आराखड्यांतर्गत वरखेडा व नळवाडपाडा गण अस्तित्त्वात आले आहेत. यातील वरखेडा गणातील गावे वरखेडा, आंबे वणी, घोडेवाडी, ओझरखेड, परमोरी, अवनखेड, वलखेड, पिंपळगाव केतकी, म्हेळुस्के, कादवा म्हाळुंगीही आहेत.
नळवाडपाडा गणातील गावे नळवाडपाडा, ओझे, नळवाडी, पिंपळगाव धूम, कोकणगाव खु. देवठाण, देवठाण पाडा, चारोसे, शिवारपाडा, वणी खुर्द, जोरण, जोरणपाडा, ठेपणपाडा, कोकण गाव बु. जालखेड, श्रीरामनगर ही गावे समाविष्ट झाली आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या वरखेडा जिल्हा परिषद गटाने शेजारील कसबे वणी, खेडगाव, मोहाडी, अहिवंतवाडी व कोचरगाव गटातील काही गावे यात समाविष्ट करण्यात आली आहेत.

ZP Nashik
1 जून सार्वजनिक वाढदिवसदिनी ग्रामीण भागात केकची विक्रमी विक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com