Marathi School
Marathi Schoolsakal

‘माय मराठी’चीच शोकांतिका! मराठी शाळांची स्थिती वाइटाकडे

देशासह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थी वळत असल्याचे पाहायला मिळते.

धुळे : देशासह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थी वळत असल्याचे पाहायला मिळते. धुळे महापालिकेच्या शाळांमध्ये विशेषतः मराठी माध्यमांच्या शाळांची स्थिती मात्र दरवर्षी वाइटाकडे जात असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर यंदा पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या. महापालिकेच्या शाळाही सुरू झाल्या मात्र, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा पाहिजे तसा नसल्याचेच पाहायला मिळते. मनपाच्या मराठी माध्यमाच्या जेमतेम आठ शाळा टिकून आहेत. यात सुमारे साधारण विद्यार्थी प्रवेशीत आहेत. उर्दू माध्यमांची स्थिती मात्र तुलनेने चांगली आहे.

तत्कालीन नगरपालिका असताना धुळ्यात तब्बल ६५ मनपा शाळा होत्या. २००८ पर्यंत यातील २८-२९ शाळा टिकल्या. नंतरच्या काळात मात्र शाळांची गळती सुरू झाली. सद्यःस्थितीत शहरात महापालिकेच्या एकूण २० शाळा आहेत. यात १२ शाळा उर्दू माध्यमाच्या तर आठ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. यात मराठी माध्यमाच्या शाळांचा प्रवास दिवसेंदिवस गळतीच्या दिशेनेच सुरू असल्याचे पाहायला मिळते. कोविड महामारीच्या संकटानंतर दोन वर्षांनी शाळा पुन्हा गजबजल्या आहेत. यंदा महापालिकेच्या शाळांमध्ये आत्तापर्यंत नव्याने २५०-३०० विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्याचे मनपा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अद्याप प्रवेश सुरू असून यात वाढ होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मागील वर्षी मनपा शाळांत एकूण ३१०० विद्यार्थी होते. अर्थात हेच विद्यार्थी यावर्षी पुढच्या वर्गांमध्ये गेले असणार. असे असले तरी इतर खासगी शाळांच्या तुलनेत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश चिंताजनक आहे.

Marathi School
यंदा बारावीपर्यंतच्या वर्गांना 100 टक्के पाठ्यक्रम लागू !

शाळा आठ अन् २४ शिक्षक

मराठी माध्यमाच्या आठ शाळांसाठी केवळ २४ शिक्षक आहेत. अर्थात सरासरी एका शाळेला केवळ तीन शिक्षक अशी स्थिती आहे. यात मोहाडीतील शाळेची स्थिती चांगली असल्याने तेथे ७-८ शिक्षकांची नियुक्ती आहे. त्यामुळे इतर शाळांमध्ये काय स्थिती असेल याची कल्पना येते. एखाद्या खासगी शाळेत जेवढे शिक्षक असतील तेवढे शिक्षक मनपाच्या आठ शाळांसाठी आहेत. अर्थात विद्यार्थ्यांअभावी शाळांसह शिक्षकांची संख्याही रोडावत चालली आहे.

उर्दू शाळा टिकून

मराठी माध्यमाच्या शाळा दरवर्षी बंद पडण्याच्या दिशेने जात असताना मनपाच्या उर्दू शाळांची स्थिती तुलनेने चांगली आहे. सद्यःस्थितीत महापालिकेच्या १२ शाळा सुरू आहेत. या सर्व १२ शाळांमध्ये सद्यःस्थितीत एकूण साधारण दोन हजार विद्यार्थी आहेत. काही भागातून तर उर्दू माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची मागणीही होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मनपाच्या किमान उर्दू शाळा टिकून असल्याने तेवढीच समाधानाची बाब म्हणावी लागेल. उर्दू माध्यमाच्या १२ शाळांसाठी ७४ शिक्षक आहेत.

मनपाच्या शाळा अशा

मराठी माध्यम शाळा...०८

शाळा क्रमांक-३,९,१४,२८,४०,५६,६४,६५

विद्यार्थी...सुमारे ७००

शिक्षक...२४

Marathi School
NDAच्या परीक्षेची तयारी करताय ? या गोष्टी लक्षात ठेवा...

उर्दू माध्यम शाळा...१२

शाळा क्रमांक-८,१०,१७,२०,२५,२६,३४,४३,४४,४७,५३,५४

विद्यार्थी...सुमारे दोन हजार

शिक्षक...७४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com