नागपूरः बाप्पाच्या आगमनाला पावसाची दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

नागपूर: गणरायाच्या आगमनाच्या पावन पर्वावर वरुणराजाने आज (शुक्रवार) शहरात दमदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सर्वच भागांत जोरदार सरी बरसल्या.

नागपूर: गणरायाच्या आगमनाच्या पावन पर्वावर वरुणराजाने आज (शुक्रवार) शहरात दमदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सर्वच भागांत जोरदार सरी बरसल्या.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्‌टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात आजपासून तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. बाप्पाच्या आगमनाच्या पुर्वसंध्येवर गुरूवारी रात्री पावसाने झोडपून काढल्यानंतर शुक्रवारीही अनेक भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अडीचच्या सुमारास आरंभ झालेला पाऊस वृत्त लिहीपर्यंत सुरूच होता. पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असून, खोलगट भागांमध्ये तलाव साचले आहेत. पावसामुळे नागपूरकरांसह बळीराजाही सुखावला आहे.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे
गणेशाची व्रते 
उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक
शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी
खासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)
महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’
बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)
शांतता सुळावर? 
ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट