दबंग ठाणेदारांचा 'दादागिरी' वर अंकुश !

यू. के. जाधव, ठाणेदार खामगाव
यू. के. जाधव, ठाणेदार खामगाव

खामगाव (बुलडाणा): दारू पिवून बुलेटवर गावभर दादागिरी करत फिरणाऱ्या बुलेट बाजीरावांच्या दादागिरीवर दबंग ठाणेदार यू. के. जाधव यांनी अंकुश बसविला आहे. गेल्या महिनाभरात दारू पिवून व नियमबाह्य दुचाकी चालविणाऱ्या जवळपास दोनशे जणांवर कारवाई करण्यात आली.

रस्त्यावर दररोज होणारे अपघात, क्षुल्लक वाद, मुलींच्या छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी व वाहतूक शिस्त लागावी याकरिता खामगाव शहर पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह, नियमबाह्य तसेच कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर लावलेल्या बुलेटचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यात दोनशे पेक्षा जास्त दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे मद्यपी दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. पोलिसांच्या या मोहिमेचे नागरिकांतून स्वागत होत आहेत. तर या कारवाईचा धसका घेत 'कायदे मे रहेंगे तो फायदेमे रहेंगे' असे बोलल्या जात आहे.

मद्यपी चालकास दंड व शिक्षा
दारू पिवून बुलेट चालवीत असलेल्या निर्मल टर्निंग भागातील रहिवासी विजय जाधव यास पोलिसांनी मुख्य रस्त्यावर पकडून गुन्हा दाखल केला. त्यास मंगळवारी न्यायालयाने 800 रुपये दंड आणि कोर्ट उठे पर्यत शिक्षा सुनावली. जाधव यांची बुलेट मे 2015 मध्ये पासिंग असून त्याने अद्याप नंबर टाकलेला नाही. दारू पिवून बुलेट चालविताना पकडले 'पाहून घेईल' असे म्हणत हुज्जत घालत होता असे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com