सोपानदेवांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

सासवड- संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. या वेळी माउलींसमवेतच्या हजारो वारकऱ्यांनी सासवडच्या संजीवन समाधी स्थळावर व देऊळवाड्याभोवती गर्दी केली होती. 

सासवड- संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. या वेळी माउलींसमवेतच्या हजारो वारकऱ्यांनी सासवडच्या संजीवन समाधी स्थळावर व देऊळवाड्याभोवती गर्दी केली होती. 

बुधवारी प्रस्थानामुळे पहाटे समाधीला अभिषेक करून सर्व धार्मिक कार्यक्रम झाले. संत सोपानदेवांच्या पादुका गोसावी यांच्या घरात औक्षण करून समाधीजवळ आणल्या. तेथून त्या देऊळवाड्यातील वीणा मंडपात आणून पालखीत ठेवल्या. याच दरम्यान देऊळवाड्यात जयघोष होत वीणा मंडपात हा प्रस्थान सोहळा टाळ-मृदंगाच्या गजरासह जयघोषात रंगला. पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम पांगारे (ता. पुरंदर) गावात निष्णाईदेवी मंदिरात झाला. उद्या गुरुवारी सोहळा परिंचेमार्गे मांडकीला मुक्कामी पोचणार आहे. नंतर निंबूत, सोमेश्वरनगर, कोऱ्हाळे, बारामती, लासुर्णे, निरवांगी, अकलूज, बोंडले, भंडीशेगाव, वाखरी असे मुक्काम करीत सोहळा ३ जुलैला पंढरपूरला पोचणार आहे. २४ जूनला सोमेश्वरनगरला गोल रिंगण, २७ ला पिंपळीला बकरी रिंगण होईल.