तुकोबांच्या पालखीचे दौंड तालुक्‍यात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज (ता. २१) सायंकाळी चारच्या सुमारास बोरीभडक येथे दौंड तालुक्‍यात प्रवेश केला. तालुक्‍यातील अनेक मान्यवरांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज (ता. २१) सायंकाळी चारच्या सुमारास बोरीभडक येथे दौंड तालुक्‍यात प्रवेश केला. तालुक्‍यातील अनेक मान्यवरांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मंगळवारच्या (ता. २०) मुक्कामानंतर पालखी सोहळा आज सकाळी यवत मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे दुपारचा विसावा झाला. यवत येथे या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी होती. मात्र, संपूर्ण तालुक्‍याच्या वतीने बोरीभडक येथे स्वागत करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. येथे आमदार राहुल कुल, पंचायत समितीच्या सभापती मीना धायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, सुरेश शेळके, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, गणेश थोरात, बाळासाहेब पवार, वैशाली नागवडे, पोपट ताकवणे, तात्या ताम्हाणे, प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार विवेक साळुंखे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे, मंडलाधिकारी दुर्गादास शेळकंदे, डॉ. शशिकांत इरवाडकर, सरपंच कमल कोळपे,  अशोक गव्हाणे, अमोल म्हेत्रे आदी उपस्थित होते. 

कासुर्डी टोलनाका व्यवस्थापनाच्या वतीने बाटलीबंद पाणी, भडंग व चहा यांचे वाटप करण्यात आले. ‘हॉटेल शेरू ढाबा’च्या वतीने चहाचे वाटप करण्यात आले. यवत येथे ‘हॉटेल कांचन सी फूड’ येथे बालाजी मित्र मंडळाच्या वतीने चहा व फराळाचे वाटप केले.