`आत्मा`ला निधीचा टेकू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

राज्य हिश्शापोटी ९ कोटींची मंजुरी 

मुंबई - कृषी विस्तारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘आत्मा‘ योजनेसाठी राज्य हिश्शापोटी ९ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. मध्यंतरी निधी उपलब्ध करून न दिल्याने ‘आत्मा’च्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले होते. 

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, अभ्यास सहलींचे आयोजन करणे, विविध योजना राबविण्यासाठी मदत करणे, यासाठी राज्य शासनाकडून ‘आत्मा’ योजना लागू करण्यात आली आहे. निधी उपलब्धतेअभावी योजनेचे काम काही प्रमाणात थंड बस्त्यात पडले होते. याविषयी सतत पाठपुरावा केल्याने राज्य सरकारने राज्य हिश्शातून ९ कोटी २२ लाख उपलब्ध करून दिले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी अत्यल्प आणि अल्पभूधारक, महिला आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचे शासनाचे आदेश आहेत. 

२०१६-१७ वर्षात ‘आत्मा’ योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी ९३१५.६४ लाख रुपयांच्या कार्यक्रमास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. केंद्र हिश्‍शापोटी १३८३.०७ लाखांची मंजुरी मिळाली आहे. त्याच प्रमाणात ४० टक्के राज्य हिश्‍शाची रक्कम ९२२.०४ लाख प्रलंबित होती. 

Web Title: Aatma nidhi manjur