esakal | साखरेचा महापूर; विक्रमी उत्पादनाकडे राज्याची वाटचाल

बोलून बातमी शोधा

sugar

साखर कारखान्यांनी आतापर्यंत गाळलेल्या ५३४ लाख टन उसापासून ५२.४७ लाख टन साखर तयार केली आहे. राज्यातील कारखान्यांकडे अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस गाळणार आहे. 

साखरेचा महापूर; विक्रमी उत्पादनाकडे राज्याची वाटचाल
sakal_logo
By
ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर शिल्लक असताना यंदाचा हंगाम आता विक्रमी साखर उत्पादनाकडे वाटचाल करीत आहे. यामुळे साखरेचा ‘महापूर’ साखर कारखान्यांची आर्थिक गणिते विस्कळीत करण्याची चिन्हे आहेत. 

डिसेंबरअखेर सर्वांत जास्त शिल्लक साखर कोल्हापूर आणि पुणे विभागात होती. ती अनुक्रमे १४.१६ लाख टन व १५.९१ लाख टन होती. कारखान्यांमध्ये भरमसाट साखर पडून असल्याचे पाहून देशी बाजारातील व्यापारी किंवा उद्योग क्षेत्राला चिंता राहिलेली नाही. त्यामुळे साखरेला मागणी राहिलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे भाव कमी करूनही साखर घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असे कारखान्यांचे म्हणणे आहे. 

केंद्र शासनाने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) ३१०० रुपये दर सध्या ठेवला आहे. सध्या चांगली व नवी साखर २९५० रुपये दराने काही व्यापारी घेत आहेत. पण हे दर देखील घसरण्याची चिन्हे आहेत. कारण साखर कारखान्यांनी आतापर्यंत गाळलेल्या ५३४ लाख टन उसापासून ५२.४७ लाख टन साखर तयार केली आहे. राज्यातील कारखान्यांकडे अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस गाळणार आहे. 

Success story: शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशा...

शेतकऱ्यांकडे सध्या उभा असलेला ऊस गाळल्यास आणखी ५० लाख टनापेक्षा जास्त साखर पुढील १२० दिवसांत तयार होईल. त्यामुळेच राज्य व केंद्र सरकारला यंदा अतिशय बारकाईने नियोजन करावे लागेल. त्यानंतरच साखरेचा महापूर नियंत्रित होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘साखरेचे साठे जसजसे वाढत जातील त्याप्रमाणे बाजारातील साखरेची दर कमी होत २७०० पर्यंत जाण्याची स्थिती यंदा आहे. यात सरकारने काही मार्ग काढून मोठ्या प्रमाणात साखर निर्यात केल्यास स्थिती किंचित बदलू शकेल. तसे न झाल्यास साखरेच्या महापुराचे संकट अटळ आहे,’’ असे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

साखर उत्पादनाची स्थिती 
- गेल्या वर्षीची शिल्लक साखर - ३६ लाख टन 
- ऑक्टोबर २० ते ३१ डिसेंबरदरम्यान तयार साखर - ३६.३५ लाख टन 
- ऑक्टोबर २० ते ३१ डिसेंबरदरम्यान विकलेली साखर - १५.८० लाख टन
- ऑक्टोबर २० अखेर गोदामातील साखर - ५६.७२ लाख टन 
- चालू हंगामात तयार झालेली साखर - ५२.४७ लाख टन 
- गेल्या हंगामातील एकूण साखर उत्पादन - ६१.६१ लाख टन 
- चालू हंगामात होणारे साखर उत्पादन - ९९ लाख टन

हेही वाचा : फुलांच्या शेतीला हवा ‘एकी’चा दरवळ

व्यापाऱ्यांकडेही  साखर पडून
देशातील व्यापाऱ्यांकडे अंदाजे ३५ लाख टन साखर आहे. व्यापाऱ्यांचा पैसा अडकून पडल्याने जुनी साखर १८५० रुपये क्विंटल दराने विकण्याची त्यांची धडपड आहे. मात्र जुनी साखर घेण्यास शीतपेय उद्योग किंवा प्रक्रिया उद्योग नाखुश आहेत. अशा स्थितीत आम्ही सध्याची ३१०० रुपये दराची साखर विकत घेणार नाही, अशी माहिती एका बड्या साखर व्यापाऱ्याने ‘अग्रोवन’शी बोलताना दिली.