भाजीपाल्याचे दर स्थिर;वांगी दरात सुधारणा

भाजीपाल्याचे दर स्थिर;वांगी दरात सुधारणा

पुणे - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २०) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली. रब्बी हंगामातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरळीत सुरू झाल्‍याने आणि मागणी पुरवठा संतुलित असल्याने सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते. तसेच टोमॅटोची हंगामातील सर्वाधिक १२ हजार क्रेट आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक दुपटीने वाढली होती. तर चंपाषष्टीमुळे वांग्याची मागणी वाढल्याने दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

परराज्यांतून आलेल्या आवकेमध्ये मध्य प्रदेशातून ३० ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ५ ट्रक, तमिळनाडू येथून २ टेम्पो शेवगा, राजस्थानहून १० टेम्पो गाजर आणि मध्य प्रदेशातून लसणाची १८ टेम्पो आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती, कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, टॉमेटो १२ हजार क्रेट, कांदा  नवीन आणि जुना सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर व स्थानिक भागांतून ४० ट्रक बटाटा आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव - 
कांदा : २००-२३०, बटाटा : १५०-२५०, लसूण : ५००-९००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २००-३००, गवार : २५०-४००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : १४०-१८०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ५०-७०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १४०-१६०, पांढरी ९०-१००, पापडी : १८०-२००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ५०-६०, कोबी : ५०-७०, वांगी : १५०-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : १५०- २००, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ७०-८०, शेवगा : ५००-६००, गाजर : १४०-१८०, वालवर : २४०-२५०, बीट : ६०-८०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : १२०-१६०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : १८०-२००, पावटा : २००-२२०, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : १८०-२००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे पावणेदोन लाख, तर मेथीची ५० हजार जुड्या ंची आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-५००, मेथी : ३००-७००, शेपू : २००-४००, कांदापात : १६००-२२०००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ६००-१०००, राजगिरा : ३००-६००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-६००, पालक : ३००-५००, हरभरा गड्डी - ६००-८००. 

फळबाजार 
फळबाजारात लिंबांची सुमारे अडीच हजार गोणी, संत्री आणि मोसंबी प्रत्येकी सुमारे ५० टन, डाळिंब ८० टन, पपई २० टेम्पो, चिकू सुमारे २ हजार गोणी, सीताफळ ५ टन, पेरू ७०० क्रेट्‌स, कलिंगड सुमारे ३० आणि खरबूज  सुमारे १५ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे ३५० गोणी आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २००-३००, मोसंबी : (३ डझन) : २००-४००, (४ डझन) : १००-१८०, संत्रा : (१० किलो) : १००-३००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-१५०, गणेश : १०-४०, आरक्ता ३०-६५, कलिंगड : ५-७, खरबूज : १०-२०, पपई : ५-१०, चिकू (१० किलो) : १००-५००, बोरे (१० किलो) चमेली ८०-१२०, उमराण ४०-६०, चण्यामण्या ४००-४३०, चेकनेट ३५०-४००. 

फुलबाजार 
वाढत्या थंडीमुळे फुलांचे उत्पादन घटले असून, लग्न हंगाम सुरू असल्याने कट फ्लॉवरली मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-३०, गुलछडी : ५०-८०, ॲस्टर : (५ जुड्या) ६-१२, सुटा ६०-८०, कापरी : २०-३०, शेवंती ८०-१००, गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, जरबेरा : २०-३०. कार्नेशियन : ८०- १००. लिलियम (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड - ३००-४०० ग्लॅडिओलस (१० काड्या)  २०-३०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com