‘आत्मा’ला अखेर निधी मिळाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

अकोला - केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक साहाय्याने सुरू असलेल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे(आत्मा)ला निधी मिळाला नसल्याने कामकाज प्रभावित झाल्याचे वृत्त ॲग्रोवनने १५ जूनच्या अंकात प्रकाशित केले होते. यामुळे संबंधित यंत्रणांनी हालचाल करून अखेरीस निधी वितरित केला आहे. केंद्र व राज्याचा हिस्सा म्हणून ३७ कोटी ७० लाख ८८ हजार या रकमेस वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याला हा निधी वितरित करण्यात आला आहे. यामुळे रखडलेले विस्तार कार्य तसेच घेतलेल्या कार्यक्रमांची देणी करण्याची सोय झाली आहे. 

केंद्र तसेच राज्याचा निधी न मिळाल्याने आत्मा यंत्रणेचे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले होते. निधीअभावी शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, गट प्रशिक्षण, राज्याबाहेरील प्रशिक्षण, पीक प्रात्यक्षिके, किसान गोष्टी, शेतकरी बक्षीस, गटनिर्मिती आदींवर परिणाम झाला होता. ॲग्रोवनमध्ये याबाबत वृत्त प्रकाशित करताच यंत्रणांनी केंद्र व राज्य हिश्‍श्‍याचा पहिला हप्ता मंजूर केला. सन २०१७-१८ या वर्षासाठी पहिला हप्ता म्हणून ३७ कोटी ७० लाख ८८ हजार रकमेला २६ जूनच्या पत्रानुसार मान्यता दिल्याचे जिल्हा यंत्रणांना कळविण्यात आले आहे. यात केंद्राचे २२ कोटी ६२ लाख ५३ हजार व राज्याचे १५ 
कोटी ८ लाख ३५ हजार रुपये आहेत.

Web Title: agro news fund to aatma