कागदी लिंबाला द्या योग्य खतमात्रा

दत्तात्रय जगताप
मंगळवार, 27 जून 2017

कागदी लिंबाला माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे. त्यामुळे झाड आणि फळांची योग्य वाढ होते. ठिबक सिंचन केले असल्यास प्रत्येक ओळीत दोन लॅटरल ठेवाव्यात किंवा एक लॅटरल ठेवून पुन्हा झाडाच्या आकारमानानुसार दुसरी लॅटरल गोलाकार पसरावी. 

कागदी लिंबाला माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे. त्यामुळे झाड आणि फळांची योग्य वाढ होते. ठिबक सिंचन केले असल्यास प्रत्येक ओळीत दोन लॅटरल ठेवाव्यात किंवा एक लॅटरल ठेवून पुन्हा झाडाच्या आकारमानानुसार दुसरी लॅटरल गोलाकार पसरावी. 

कागदी लिंबाच्या पूर्ण वाढ झालेल्या 
झाडास १५ किलो शेणखत, १५ किलो निंबोळी पेंड, ६०० ग्रॅम नत्र, ३०० 
ग्रॅम स्फुरद, ६०० ग्रॅम पालाश प्रतिझाड प्रतिवर्षी द्यावे.  खते देताना शिफारशीत खतांपैकी ४० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश, शेणखत व निंबोळी पेंड जून-जुलै महिन्यात द्यावी. राहिलेली ६० टक्के नत्र मात्रा दोन समान हप्त्यांत सप्टेंबर व जानेवारी महिन्यात द्यावी.

अन्नद्रव्यांच्या मात्रेची विभागणी 
मार्च - ३० टक्के नत्र + ४० टक्के स्फुरद + १० टक्के पालाश
मे - ३० टक्के नत्र + ३५ टक्के स्फुरद + १० टक्के पालाश
जुलै - २० टक्के नत्र + २५ टक्के स्फुरद + ३० टक्के पालाश
सप्टेंबर - १० टक्के नत्र + २५ टक्के पालाश
नोव्हेंबर - १० टक्के नत्र + २५ टक्के पालाश

चौथ्या वर्षानंतर वरील खतांच्या बरोबरीने प्रतिझाडाच्या आळ्यात १०० ग्रॅम पीएसबी, १०० ग्रॅम ॲझोस्पिरीलियम व १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा मातीत मिसळून द्यावे. 

अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार झिंक सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी), मॅग्नेशियम सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी), मॅगनीज सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) आणि फेरस सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी), कॉपर सल्फेट  (३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी नवीन पालवी आल्यानंतर जुलै व मार्च महिन्यात करावी.

पाणी व्यवस्थापन 
पाट पाणी देताना झाडांच्या खोडास पाण्याचा प्रत्यक्ष संपर्क येऊ देऊ नये. त्यासाठी दुहेरी आळे (डबल रिंग) पद्धतीने पाणी द्यावे. 

ठिबक असल्यास प्रत्येक ओळीत दोन लॅटरल ठेवाव्यात किंवा एक लॅटरल देऊन पुन्हा झाडाच्या आकारमानानुसार दुसरी लॅटरल गोलाकार पसरावी. 
झाडाची जोमदार वाढ व दर्जेदार फळांचे अधिक उत्पादनासाठी तसेच पाण्याच्या व खताच्या बचतीसाठी दररोज बाष्पपर्णोत्सजनाच्या ८० टक्के पाणी व शिफारशीत खत मात्रेच्या ८० टक्के नत्र व पालाश ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. तसेच शेणखत, निंबोळी पेंड, ३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रतिझाड प्रतिवर्ष जमिनीतून द्यावे.

आंतरपिके 
पहिल्या चार वर्षांपर्यंत दोन ओळीतील मोकळ्या जागेत भुईमूग, चवळी, मूग, गवार, सोयाबीन, कांदा, इत्यादी पिकांची लागवड  करावी. 

- ०२४२६- २४३२४७
(उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Web Title: agro news lemon fertilizer