तांदूळ निर्यातीत होतेय वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली/मुंबई - यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीमध्ये वाढ झाल्याची माहिती अपेडाने नुकतीच दिली आहे. यामध्ये बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात प्रमुख आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २.०७ दशलक्ष टन तांदळाची निर्यात झाली होती. ती यंदा वाढून २.१३ दशलक्ष टन झाली आहे.

अपेडाने दिलेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये (एप्रिल ते सप्टेंबर) बासमती तांदळाची निर्यात १.६३ अब्ज डॉलर होती. ती यंदाच्या कालावधीत २.१३ अब्ज डॉलरपर्यंत पोचली आहे. गेल्या वर्षी बिगर बासमती तांदळाची १२८२ दशलक्ष डॉलर निर्यात होती. ती आता १६९३ दशलक्ष डॉलरपर्यंत वधारली आहे. 

व्यापारी आणि निर्यातकांनी दिलेल्या माहितीनुसार युरोपसह भारतीय तांदळाचा प्रमुख आयातदार असलेल्या इराणणे आयात निर्यातीचे नियम कडक केले आहेत. याची प्रभावी अंलबजावणी सुरू होईपर्यंत शक्‍य तेवढा तांदळाचा साठा करून ठेवायचा, असा तेथील व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. यामुळे तांदळाला मागणी वाढून निर्यात वधारली आहे.

गवारगमची निर्यातही वाढली
२०१६ मध्ये (एप्रिल ते सप्टेंबर) गवारगमची १६३,९५८ टन निर्यात झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन यंदाच्या कालावधीत ती २५२,५६८ टनांपर्यंत पोचली आहे.

रासायनिक अंशाबाबत आव्हान
युरोपीयन संघाच्या अन्न सुरक्षा संस्थेने (ईएफएसए) तांदळाच्या आयातीबाबत यंदा कठोर नियमावली केली आहे. १ नोव्हेंबरपासून याबाबतीत अंमलबजावणीही सुरू झाली आहे. यामुळे तांदळात रासायनिक अंशाबाबतचे आव्हान असून ते अतिशय कमी ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे अपेडाचे म्हणणे आहे.

Web Title: agro news rice export growth