गाळप हंगाम १ अाॅक्टोबरपासून सुरू होणे कठीण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

साखर कारखानदारांचा सूर; महाराष्ट्रात मजुरांची कमतरता

मुंबई - अागामी ऊसगाळप हंगाम अाॅक्टोबरमध्ये सुरू करण्याच्या सूचना केंद्राने केल्या अाहेत. मात्र, कमी साखर उतारा अाणि मजुरांच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील ऊसगाळप हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता कमी अाहे. अाॅक्टोबरच्या सुरवातीला गाळप हंगाम सुरू केल्यास साखर उतारा अाणि उत्पादनात घट होणार असल्याचा सूर साखर कारखानदार संघटनांनी व्यक्त केला अाहे. 

साखर कारखानदारांचा सूर; महाराष्ट्रात मजुरांची कमतरता

मुंबई - अागामी ऊसगाळप हंगाम अाॅक्टोबरमध्ये सुरू करण्याच्या सूचना केंद्राने केल्या अाहेत. मात्र, कमी साखर उतारा अाणि मजुरांच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील ऊसगाळप हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता कमी अाहे. अाॅक्टोबरच्या सुरवातीला गाळप हंगाम सुरू केल्यास साखर उतारा अाणि उत्पादनात घट होणार असल्याचा सूर साखर कारखानदार संघटनांनी व्यक्त केला अाहे. 

महाराष्ट्रातील गाळप हंगाम सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर १ नोव्हेंबरपासून सुरू होतो. मात्र, यंदा १ अाॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याबाबत केंद्राकडून हालचाली सुरू अाहेत. या पार्श्वभूमीवर मजुरांच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित झाला अाहे.

‘‘मजुरांची कमतरता असल्याने अाॅक्टोबरच्या मध्यावधीनंतरच गाळप हंगाम सुरू होईल,’’ असे पश्चिम महाराष्ट्र साखर कारखानदार संघटनेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. अद्याप उसाची पूर्ण वाढ झालेली नाही. यामुळे गाळप हंगाम लवकर सुरू केल्यास साखर उतारा कमी मिळू शकतो, असेही त्यांनी म्हटले अाहे.

अपरिपक्व उसामुळे उत्पादनात घट होऊ शकते. यामुळे गाळप हंगाम १ अाॅक्टोबरपासून सुरू करणे कठीण अाहे, असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर यांनी सांगितले.
ऊसगाळप हंगाम लवकर सुरू केल्याने साखर उतारा ११.२-११.३ टक्क्यांवरून ९.५ टक्क्यांपर्यंत खाली घसरू शकतो, असा दावा बारामती (जि. पुणे) येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अार. एस. तावरे यांनी केला अाहे. अाॅक्टोबरच्या सुरवातीला गाळप हंगाम सुरू केला, तर प्रतिटन उसामागे १० किलो साखर उत्पादनात घट होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली अाहे. 

अाॅक्टोबरच्या सुरवातीला हंगाम सुरू झाल्यास प्रतिटन उसामागे ३७५-४०० रुपये नुकसानभरपाईची मागणी कारखान्यांकडून केली जाईल, 
असेही कारखानदार संघटनांनी स्पष्ट केले अाहे.

मजुरांची कमतरता असल्याने अाॅक्टोबरच्या मध्यावधीनंतरच गाळप हंगाम सुरू होईल.
- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, साखर कारखानदार संघटना

अपरिपक्व उसामुळे उत्पादनात घट होऊ शकते. यामुळे गाळप हंगाम १ अाॅक्टोबरपासून सुरू करणे कठीण अाहे.
- संजीव बाबर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशन

अाॅक्टोबरच्या अखेरीस गाळप हंगाम सुरू होणार
गाळप हंगामाच्या तयारीसाठी कारखान्यांना अधिक वेळ हवा असतो. त्यासाठी अाॅक्टोबरच्या अखेरीस गाळप हंगाम सुरू होऊ शकतो, असे साखर अायुक्तालयातील सूत्रांनी म्हटले अाहे. 

Web Title: agro news sugarcane galap season not starting from 1 october