साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात खरेदी होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर उत्पादक राज्य आहे. राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतात; परंतु तूर एकदा बाजारात आली की दर पडतात. यंदाही तोच अनुभव सध्या शेतकरी घेत आहेत. हमीभाव ५४५० असताना बाजारात मात्र तूर ३८०० रुपयांपासून खरेदी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला ४ लाख ४६ हजार ८०० टन तूर हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. खरेदी संस्थांशी करार झाल्यानंतर राज्यात खरेदी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बाजारात तुरीचे दर हमीभावाच्या खाली गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्याला हमीभावाने ४ लाख ४६ हजार ८०० टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

ही तूर ९० दिवसांत खरेदी करायची आहे. तुरीची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या अकोला बाजारात सोमवारी (ता. २२) तुरीला ४१०० रुपये दर मिळाला, हा दर ५४५० या हमीभावापेक्षा खूपच कमी होता. शासनाच्या खरेदी संस्थांशी करार झाल्यानंतर राज्यात खरेदी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने ५ लाख ७५ हजार टन तूर हमीभावाने खरेदी केली होती. तर पॅन-इंडियाने दीड लाख टन खरेदी केली होती.

३९.९ लाख टन उत्पादनाचा अंदाज
२०१६-१७ मध्ये आधीच्या वर्षी डाळींचे भाव गगनाला भिडल्याने सरकारने शेतकऱ्यांना कडधान्य लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन होऊन दराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे २०१६-१७ मध्ये सरकारला विक्रमी तूर खरेदी करावी लागली होती. राज्यात ४७.८ लाख टन तूर उत्पादन झाले होते. यंदा ३९.९ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.

Web Title: agro news tur purchasing in maharashtra