पश्चिम बंगाल दुधाला देणार दोन रुपये अनुदान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कोलकाता - राज्यातील दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी पश्चिम बंगाल सरकार प्रयत्नशील आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील दूध उत्पादकांना खरेदी दरावर प्रतिलिटर दोन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारी दूध सोसायट्यांच्या माध्यमातून सरकारला दूध विकणाऱ्या उत्पादकांना याचा लाभ मिळणार आहे. 

पश्चिम बंगाल राज्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. इतर राज्यांप्रमाणे येथेही दूध दराचा प्रश्न कायम अस्तित्वात असतो. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांनी आंदोलनेही केली आहेत. सध्या येथे दुधाला २५ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. 

सध्याचा २५ रुपये प्रतिलिटर दर कायम राहणार असून, यावर उत्पादकांना दोन रुपये अनुदान मिळणार आहे. अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पश्चिम बंगाल राज्यात दूध व्यवसायात सहकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथील पश्चिम बंगाल सहकारी दूध उत्पादक संघाशी जवळपास १.२ लाख दूध उत्पादक जोडले गेले आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा विचार केल्यास राज्यातील एकूण १० लाख लोकांना या अनुदान योजनेचा लाभ होणार आहे. दुधाला अनुदान देण्यासाठी राज्य सरकाच्या तिजोरीवरही ताण पडणार आहे. राज्याला जवळपास ६.५ कोटी रुपये यावर खर्च करावे लागणार आहे आणि ही रक्कम वित्त मंत्रालयाने आधीच दिली आहे. 

सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यातुन कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना व्यवसाय वृद्धी करण्यासही मदत होईल. सध्या राज्यात १४ दूध संघ दूध खरेदी करतात. या संघांना दूध देणाऱ्या १ लाख २० हजार उत्पादकांना थेट लाभ मिळणार आहे. 

पश्चिम बंगालचा दुग्ध व्यवसाय
दुभत्या जनावरांची संख्या ३५ लाख ६ हजार
दूध उत्पादन ५१.८३ लाख टन 
देशातील उत्पादनातील हिस्सा ३.२ टक्के
दूध व्यवसायाची वाढ २.४७ टक्के
सहकारी सोसायट्या ३४५
सदस्य संख्या १ लाख २० हजार
सध्याचा दूध दर २५ रुपये लिटर

Web Title: agro news western bangal milk subsidy