निर्यातक्षम भेंडीची करार शेती

bhendi
bhendi

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अलीकडील वर्षांत दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. तरीही प्रयोगांच्या वाटेवरून चालण्याची त्यांची हिंमत तुटलेली नाही. कारण आपल्या प्रगतीचे कारण तिथेच असल्याचे त्यांना माहीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून गेवराई तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी भेंडीच्या करार शेतीचा मार्ग धरला आहे. त्यांनी मुंबईच्या एक ते दोन कंपन्यांसोबत काम करण्यास सुरवात केली आहे. त्या माध्यमातून कापूस, तूर, बाजरी, गहू, ज्वारी आदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या प्रयोगाचा पर्याय मिळाला आहे. त्यातून काहींना रोजगाराची संधी निर्माण झाली. 

भेंडीची करार शेती दृष्टिक्षेपात 
- गेवराई तालुक्यातील सावरगाव, वडगाव (सुशी), सिंदखेड, चिखली आदी गावांतील शेतकऱ्यांचा समावेश. 
- मुंबईतील कंपनीला माल पुरवला जातो. सावरगाव येथील राजेंद्र जाधवर या करार शेतीत एका कंपनीच्या वतीने स्थानिक समन्वयक म्हणून काम पाहतात. 
- बाजारातील चढ- उतार काही असोत, शेतकऱ्यांना २४ रुपये प्रतिकिलो हमीभाव ठरवून दिला 
आहे. 
- यातील एका कंपनीसोबत जे शेतकरी जोडले होते, त्या माध्यमातून २०१५ मध्ये १०४ टन, २०१६ मध्ये ११६ टन भेंडी मुंबईला पाठवण्यात आली. तेथून ही कंपनी युरोप व काही प्रमाणात आखाती देशांत पाठवत आहे. यंदा आत्तापर्यंत सुमारे ८२ टन पाठवली आहे. 
- प्रत्येक दिवशी एकूण सुमारे दोन हजार टन भेंडी पाठविली जाते. 

लागवडीचे टप्पे 
निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन दीर्घकाळ सुरू राहण्यासाठी लागवडीचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार पहिली लागवड ऑगस्ट, दुसरी जानेवारीत, तर तिसरी फेब्रुवारी- मार्चमध्ये केली जाते. यात शेतकऱ्यांना एकच वाण लावणीसाठी निश्चित केले जाते. गादीवाफा व ठिबकचा वापर करून सुधारित तंत्राचा वापर केला जातो. लागवडीचे अंतर असे ठेवले जाते, की निर्यातीला योग्य अशी भेंडी वेळेत पोसण्यास मदत होते. 

यंदाची लागवड व उत्पादन 
- यंदा जानेवारीत सावरगाव, सुशीवडगाव व सिंदखेड या तीन गावांतील १३१ शेतकऱ्यांनी ५५ एकरांवर, तर मार्चमध्ये ४५ शेतकऱ्यांनी ३० एकरांवर भेंडी घेतली. सन २०१५ ऑगस्टमध्ये एकूण ३० एकरांत सुमारे ४० शेतकऱ्यांचा समावेश होता. 
- पाण्याची अडचण असली तरी एकरी पाच ते सहा टनांपर्यंत उत्पादन घेण्यापर्यंत शेतकऱ्यांनी मजल मारली आहे. 
- निर्यातक्षम उत्पादन घेताना रासायनिक खते व कीडनाशकांपेक्षा जैविक निविष्ठांचा वापर करण्यावर भर राहतो, त्यासाठी संबंधित कंपनी मार्गदर्शन करते. युरोपीय देशांत जाईपर्यंत काही कालावधी लागत असल्याने भेंडीचा आकार, लव व एकूणच गुणवत्ता चांगली असण्यावर कटाक्ष राहतो. 
- करार केलेल्या कंपनीकडून भेंडी उत्पादकांना कीडनाशक फवारणी मोफत करून दिली जाते, त्यासाठी तीन गावांत मिळून दोन व्यक्तींची नियुक्‍ती केली आहे. 
- आजघडीला ७० टक्‍के भेंडी ठिबकवर घेतली जाते. उर्वरित शेतकरी मोकळे पाणी देऊन उत्पादन घेतात. पुढील वर्षी मल्चिंगचा वापर करण्याचा मानस अाहे. 

ग्रेडिंग 
काढणीनंतर प्रत्यक्ष शेतकरी त्याच्या शेतात मालाचे प्रथम ग्रेडिंग करतो. मुंबईला पुन्हा प्रत चाचपणी व ग्रेडिंग होते. चार किलो बॉक्समध्ये पॅकिंग होते. कीडनाशक अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत टेस्टिंगही होते. 

मी २० ते ३० गुंठ्यांत निर्यातक्षम भेंडी घेतो. किमान एक क्‍विंटलची तोड दरदिवशी होते. 
आत्तापर्यंत कंपनीसाठी १५ क्विंटलपर्यंत माल पाठवला आहे. त्यास किलोला २४ रुपये हमीभाव मिळतो. उर्वरित भेंडी औरंगाबादच्या बाजारात पाठवितो. 
- शंभेश्वर खाडे - ९७६७७४८८९४ 
सावरगाव 

तीस गुंठ्यांत भेंडी आहे. निर्यातक्षम उत्पादनामुळे उत्पन्नाचा हमखास स्रोत तयार झाल्याने कुटुंबाला आधार मिळाला. 
लक्ष्मण सत्कर, सावरगाव - ९०७५९०३७१३ 

व्हेजनेट प्रकल्पांतर्गत आम्ही आमच्या कार्यक्षेत्रातील ८६ शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. हे शेतकरी भेंडीची निर्यातक्षम शेती करीत आहेत. या शेतकऱ्यांना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याचे कामही केले आहे. मध्यंतरी अपेडा या दिल्लीस्थित केंद्रीय संस्थेचे अधिकारीही प्लॉट पाहण्यासाठी आले होते. विभागीय कृषी सहसंचालक रमेश भटाणे यांचे सहकार्य या उपक्रमास लाभले आहे. 
- संतोष घसींग 
मंडळ कृषी अधिकारी, मादळमोही, ता. गेवराई, जि. बीड 
९४२३६९१०९१ 

हमीभाव मिळत असल्याने भेंडी उत्पादनाकडे वळलो. सव्वा एकर भेंडी आहे. यंदा जवळपास चार- साडेचार टन भेंडी निर्यातीसाठी पाठविली. 
- भागवत काळे - ९१३०२८२१८७ 
वडगाव, ता. गेवराई 

मी यंदाच निर्यातक्षम भेंडी उत्पादनाकडे वळलो. वीस गुंठ्यांत लागवड असून आत्तापर्यंत दोन टन माल रवाना झाला आहे. दररोज ५० ते ६० किलो भेंडी निर्यातीसाठी पाठवतो. तर, उर्वरित भेंडी स्थानिक बाजारात पाठवितो. त्याला किलोला १५ ते २० रुपये दर सध्या मिळतो आहे. 
- श्रीमंत ठोसर - ७९७२१०३८३५ 
सिंदखेड, ता. गेवराई 

माल संकलनाचे नियोजन 
सहा ते सात किलोमीटर अंतरावर तिन्ही गावे असल्याने दररोज दुपारी तीनच्या सुमारास प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातून माल संकलित करण्याचे काम केले जाते. रात्री नऊ वाजेपर्यंत हे काम चालते. त्यासाठी तीन व्यक्ती व दोन वाहनांची सोय आहे. माल वाहनातून मुंबईकडे रवाना केला जातो. वाहनाच्या नियोजनाची जबाबदारी भेंडी उत्पादक शेतकऱ्यांपैकी लक्ष्मण सत्कर पाहतात. 

गेल्या वर्षी रोख स्वरूपात शेतकऱ्यांना पैसे मिळाले. नोटाबंदीनंतर चेकने पैसे देण्याची तरतूद केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मालाच्या उपलब्धतेनुसार दिवसाला एक हजारापासून ते कमाल दोन हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. .... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com