देशात कापसाचा पेरा वाढला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती; खरीप पेरणी १३० लाख हेक्‍टरवर
नवी दिल्ली - देशभरात शुक्रवारअखेर (ता. २३) कापसाची पेरणी २४.७० लाख हेक्टरवर झाली होती. गतवर्षी या कालावधीत ती १९.०७ लाख हेक्टर होती. तुलनेत पेरणी क्षेत्रात सुमारे पाच लाख हेक्टरने वाढ झाली आहे, असे केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती; खरीप पेरणी १३० लाख हेक्‍टरवर
नवी दिल्ली - देशभरात शुक्रवारअखेर (ता. २३) कापसाची पेरणी २४.७० लाख हेक्टरवर झाली होती. गतवर्षी या कालावधीत ती १९.०७ लाख हेक्टर होती. तुलनेत पेरणी क्षेत्रात सुमारे पाच लाख हेक्टरने वाढ झाली आहे, असे केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

शुक्रवारी आठवड्याचा खरीप अहवाल जाहीर करण्यात आला. यामध्ये देशातील खरीप पेरणी १३०.७४ लाख हेक्‍टरपर्यंत पोचली होती, असे केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गतवर्षी या कालावधीत खरीप पेरणीचे क्षेत्र ११९.२८ लाख हेक्‍टर होते. लागवड क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेत सुमारे अकरा लाख हेक्‍टरने वाढ झाली आहे. पेरणीचे प्रमाण वाढत असलेले जरी दिसत असले तरी मध्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पेरण्यांनी अद्याप गती घेतलेली नाही. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि लगतच्या राज्यांमध्ये पावसाअभावी पेरण्या संथगतीने होत आहेत. अनेक भागांतील शेतकरी कोणत्या पिकांची लागवड करावी, याविषयी द्विधा मनस्थितीत होते. गेल्या वर्षी डाळवर्गीय पिकांचे भरघोस उत्पादन झाले होते. त्यामुळे तुरीचे दर घसरले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतीच विविध शेतीमालांची एमएसपी जाहीर केलेली आहे. 

शेतकऱ्यांचा कल कापसाकडे?
गेल्या वर्षात डाळवर्गीय पिकांचे भरघोस उत्पादन होऊनही रास्त दर न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने झाली. दरांबाबत संवेदऩशील असल्यामुळे शेतकरी केंद्र सरकार जाहीर करत असलेल्या एमएसपीनुसार शेतीमालाच्या लागवडीस प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. 
गेल्या वर्षात सरकारने डाळवर्गीय पिकांना प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचे आवाहन केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीचे भरघोस उत्पादन घेतले. परिणामी बाजार समितीत आवक वाढून तुरीची हमीभावाच्या कमी दराने विक्री करावी लागली होती. यंदाही काही तेलबिया आणि कडधान्यांच्या एमएसपीमध्ये वाढ झालेली आहे. तरीही डाळवर्गीय पिकांएेवजी शेतकरी कापूस लागवडीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: agrowon news cotton agriculture increase