पीकविमा प्रस्तावासाठी रांगा कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

परभणी - पीकविमा प्रस्तावासाठी सोमवार (ता. ३१) अखेरची मुदत असल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता. ३०) सकाळपासूनच बॅंकांसमोर रांगा लावल्या होत्या. 

परभणी - पीकविमा प्रस्तावासाठी सोमवार (ता. ३१) अखेरची मुदत असल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता. ३०) सकाळपासूनच बॅंकांसमोर रांगा लावल्या होत्या. 

पीकविम्यासाठी मुदतवाढ देण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून पीक संरक्षण घेण्यासाठी बॅंकासमोर रांगा लावल्या होत्या. आॅनलाइन पद्धतीमुळे वेळ लागत असल्याने शनिवार (ता. २९) पासून बॅंकामध्ये आॅफलाइन विमा प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. परंतु सीएससी केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. बॅंका वेळेत बंद होत आहेत. परंतु सीएससी केंद्र रात्री उशिरा तसेच काही ठिकाणी रात्रभर सुरू राहात आहेत.

आॅनलाइन की आॅफलाइन घोळामुळे विमा प्रस्ताव स्वीकारण्याचा वेग कमी होता. सोमवारी (ता. ३१) विमा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत आहे. परंतु अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमा योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Web Title: agrowon news Crop insurance farmer