सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव होणार

प्रतिनिधी
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे - सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिभूषण पुरस्काराने गाैरविण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी गाैरविण्यात येते. सेंद्रिय शेती करणाऱ्या ८ विभागांतून ८ शेतकऱ्यांना पुरस्कारांनी, तर एका संस्थेला असे एकूण ९ पुरस्कार देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.   

रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे शेतजमिनीचा पाेत खालावत असून, भविष्यात जमीन शेती याेग्य राहणार नसल्याचा धाेका निर्माण झाला आहे, तर दिवसेंदिवस सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत अाहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीमध्ये विविध प्रयाेग करून सेंद्रिय शेती यशस्वी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राेत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये सेंद्रिय शेतीचा वेगळा विभाग केला आहे. या विभागांमध्ये राज्याच्या विविध ८ विभागांमधून ८ शेतकरी आणि एका संस्थेला कृषिभूषण (सेंद्रिय शेती) या पुरस्कारांनी गाैरविण्यात येणार   आहे.

Web Title: agrowon news farmer Organic farming