सोलापुरात दोडका, गवार, भेंडीला उठाव

सुदर्शन सुतार
Tuesday, 28 November 2017

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दोडका, गवार, भेंडीच्या दरात वाढ झाली होती. त्यांना उठावही चांगला मिळाला. त्याशिवाय कांद्याच्या दरातील तेजी या सप्ताहात पुन्हा कायम राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दोडका, गवार, भेंडीच्या दरात वाढ झाली होती. त्यांना उठावही चांगला मिळाला. त्याशिवाय कांद्याच्या दरातील तेजी या सप्ताहात पुन्हा कायम राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दोडक्‍याची आवक रोज ४० क्विंटल, गवारची २० क्विंटल, भेंडीची १५ क्विंटल अशी राहिली; पण मागणी चांगली असल्याने दरात तेजी राहिली. या सगळ्या फळभाज्यांची आवक स्थानिक भागातून झाली. दोडक्‍याला प्रतिदहा किलोसाठी १०० ते २०० रुपये, गवारची २०० ते ३०० रुपये आणि भेंडीला १८० ते ३०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, टोमॅटोचे दरही काहीसे स्थिर राहिले. त्यांचीही आवक प्रत्येकी १०० ते ४०० क्विंटलपर्यंत झाली. या सप्ताहात आवकेत काहीशी घट झाली; पण त्यांचे दर स्थिर राहिले. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २५० रुपये आणि टोमॅटोला २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये मेथीला पुन्हा उठाव मिळाला. कोथिंबिर, शेपूला मात्र तेवढा उठाव मिळाला नाही. मेथीला शंभर पेंढ्यासाठी ६०० ते ८०० पये, शेपूला ३०० ते ४०० रुपये आणि कोथिंबिरीला ५०० ते ७०० रुपये असा दर मिळाला.

कांद्याच्या दरातील तेजी कायम 
कांद्याच्या दरातील तेजी या सप्ताहातही पुन्हा कायम राहिली. कांद्याला मागणीही वाढली. कांद्याची आवक या सप्ताहातही रोज २०० ते ३०० गाड्यांपर्यंत राहिली. आवक वाढूनही दर मात्र तेजीत राहिले. कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते ५००० व सरासरी ३५००  रुपये इतका दर मिळाला. येत्या आठवड्यात हे दर आणखी वाढण्याची शक्‍यता व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news solapur Lady's Finger Ridge Gourd Gawar vegetables