भाजीपाला क्रिस्पला ग्राहकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

रोपीय देशामधील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी कमालीची जागरूकता असते. त्यामुळे या देशातील प्रक्रिया उद्योगातील कंपन्या विविध आरोग्यदायी पदार्थांच्या निर्मितीवर सातत्याने भर देतात. प्रक्रिया तंत्रात बदल करून दर वर्षी नवीन उत्पादने बाजारपेठेत आणतात. भाजीपाल्यातून जीवनसत्त्वे आणि आरोग्यदायी घटक मिळत असल्याने रोजच्या आहारात भाजीपाल्याचा समावेश असतो. हीच गरज ओळखून युरोपातील प्रक्रिया उद्योगातील कंपनीने भाजीपाला क्रिस्प उत्पादनावर भर दिला आहे. या उत्पादनांना सुपर मार्केटमधून चांगली मागणी वाढली आहे. 

ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन युरोपातील एका कंपनीने फळांच्या बरोबरीने गाजर, बीट आणि रताळाचे क्रिस्प बाजारपेठेत आणले आहेत. याचबरोबरीने रोजच्या आहाराच्या दृष्टीने बटाटा, कडधान्यांपासूनही खाद्यपदार्थ तयार केले आहेत. या उत्पादनांनाही युरोप आणि आखाती देशांतून चांगली मागणी आहे. या उत्पादनांनमध्ये मीठ, साखरेचे अत्यल्प प्रमाण आहे. या उत्पादनांचा स्वाद आणि रंगही नैसर्गिक ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनांची नैसर्गिक चव मिळते. प्रक्रिया उद्योगातील ही कंपनी प्रामुख्याने नेदरलॅंडमधून भाजीपाला खरेदी करते. रताळाची खरेदी प्रामुख्याने शेतकरी गटांकडून केली जाते. अशा पद्धतीने ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विविध पदार्थांच्या निर्मितीवर कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: agrowon news vegetables