बेदाण्याच्या ब्रॅंडिंगसाठी नवे मार्केट तंत्र हवे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सांगली - सांगलीच्या बेदाण्याला जी. आय. मानांकन मिळाले हे अभिमानास्पद आहे, मात्र हा ब्रॅंड विकसित करून नव्या मार्केट तंत्राचा नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला पाहिजे, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे यांनी व्यक्त केले. सांगली "सकाळ' कार्यालयात आज बेदाणा विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे राज्याध्यक्ष सुभाष आर्वे, "सकाळ'चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, "सकाळ' सांगलीचे सहयोगी संपादक शेखर जोशी, "सकाळ'चे वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक आनंद शेळके, प्रगतशील द्राक्ष बागायतदार एन. बी. म्हेत्रे प्रमुख उपस्थित होते. 

श्री. साबळे म्हणाले,""मानांकानाचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन बेदाण्याचे मार्केटिंग करणे आवश्‍यक आहे. आता जग ऑनलाइन मार्केटिंगचे आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेची माहिती मिळण्यास मदत होईल. बेदाणा विक्री करताना त्याची प्रतवारी होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे बेदाण्याला चांगला दर मिळेल. दैनिक "ऍग्रोवन'ने यात पुढाकार घेऊन शासन, द्राक्ष बागायतदार संघासारख्या संस्था यांच्या आधारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिल्यास या व्यवसायातील नव्या वाटा खुल्या होतील.'' 

श्री. आर्वे म्हणाले,""बेदाण्याला नवीन मार्केट शोधून बेदाण्याच्या ब्रॅंडिंगसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. द्राक्ष संशोधन केंद्रामार्फत बेदाणा निर्मितीसाठी द्राक्षाच्या नवीन जाती विकसित करण्याचे काम सुरू केले आहे.'' श्री. म्हेत्रे म्हणाले,""दर्जेदार बेदाणा बणविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करायला हवे आहे. 

यावेळी "सकाळ' सांगलीचे जाहिरात व्यवस्थापक उदय देशपांडे, "ऍग्रोवन'चे व्यवस्थापक शीतल मासाळ, बजाज ऍग्रोचे संचालक शेखर बजाज, कृष्णा ट्रेडर्सचे संचालक सचिन डोळ, चौफेर क्रिएशनचे संचालक अमोल मद्वाण्णा आदी उपस्थित होते. 

Web Title: Bedana branding new market