Fake Doctors in Ahilyanagar : अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया
Bogus Doctors Exposed in Ahilyanagar : वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे रुग्णांची तपासणी करत असल्याचे त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करत असल्याची माहिती आरोग्य सेवा रुग्णालय (राज्यस्तर) मुंबई येथून महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती.
Ahilyanagar: Shocking case of fake doctors performing surgeries without medical qualifications – FIR filed.Sakal
अहिल्यानगर : वैद्यकीय पदवी नसताना, वैद्यकीय व्यावसायिक नसताना दवाखाना चालवून, रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या ॲलोपॅथीची औषधे देणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर चौकशी करून महानगरपालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.